शिमला - जगातील सर्वात उंचीवर असलेल्या बोगद्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. अटल टनेल रोहतांग असे या बोगद्याचे नामकरण करण्यात आले आहे. अटल टनेल ९ किलो मिटर लांबीचा आहे. बोगदा झाल्याने मनाली ते लेहचे अंतर जवळपास ४६ किलो मिटरने कमी होणार आहे
२०१० पासून या बोगद्याचे काम सुरू आहे. बोगदा झाल्याने मनाली ते लेहचे अंतर जवळपास ४६ किलो मिटरने कमी होणार आहे. शिवाय मनाली आणि स्पीटी व्हॅलीला या बोगद्या मुळे वर्षभर जोडले जाणार आहे. यापूर्वी हिवाळ्यात स्पीटी व्हॅली आणि लाहौल हा परिसराचा संपर्क तुटलेला असायचा. पर्यटनाच्या दृष्टीनेही हा बोगद्याचे विशेष महत्व आहे. समुद्र सपाटीपासून तब्बल ३ हजार फुट उंचीवर हा बोगदा बनवण्यात आला आहे. दरम्यान या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर उपस्थित रहाणार आहेत.