ETV Bharat / bharat

मुंबईत मोदींच्या हस्ते तीन मेट्रो मार्गिकांचे भूमिपूजन; औरंगाबादलाही जाणार - foundation stone for three metro lines in mumbai

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळे केलेल्या विकासकामांची यादी वाढवावी यासाठी भाजपने आज भूमिपूजनांचा धडाका लावला आहे.

मेट्रो
author img

By

Published : Sep 7, 2019, 12:06 PM IST

Updated : Sep 7, 2019, 12:27 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईतील ३ मेट्रो मार्गिकांचे भूमिपूजन करण्यात आले. वांद्रे-कुर्ला-संकुलामध्ये मेट्रो 10, 11, 12 या तीन मार्गिकांचे भूमिपूजन झाले. या तीन मेट्रो मार्गिकांसह मेट्रो भवनचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. पंतप्रधान मोदींनी सर्व सोयींनी युक्त अशा मेट्रो ट्रेनच्या डब्यात चढून पाहणी केली. हा मेक इन इंडियाअंतर्गत भारतात तयार झालेला मेट्रोचा पहिलाच डबा आहे.

या कार्यक्रमांसाठी मोदींचे मुंबईच्या विमानतळावर काही वेळापूर्वी आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले.

  • PM Narendra Modi arrives in Mumbai, received by Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari and CM Devendra Fadnavis. PM Modi will lay foundation stone for three metro lines in Mumbai. pic.twitter.com/VY4smmelrC

    — ANI (@ANI) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो-10 आणि कल्याण ते तळोजा मेट्रो-12 महानगर प्रदेशातील चाकरमान्यांसाठी तर वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मेट्रो-11 ही मार्गिका वडाळ्याहून दक्षिण मुंबईकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी उपयोगी ठरणार आहे.

मेट्रो भवन ही इमारत 154 मीटर उंच असून 32 मजले यात असणार आहेत. या इमारतीमधून ३३७ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. बीकेसीमध्ये मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेला पहिला मेट्रो कोच देखील प्रदर्शनासाठी ठेवलेला आहे.

भाजपसाठी मेट्रो प्रकल्प हा मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे. जे आधीच्या राज्य सरकारला जमले नाही ते आम्ही करून दाखवले असे दाखवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा असेल. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळे केलेल्या विकासकामांची यादी वाढवावी यासाठी भाजपने आज भूमिपूजनांचा धडाका लावला आहे, अशी चर्चा आहे.

दरम्यान, विले पार्ले येथील लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिर येथे पंतप्रधान मोदींनी प्रार्थना केली.

Intro:मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळे केलेल्या विकासकामांची यादी वाढवावी यासाठी भाजपने आज भूमीपूजनांचा धडाका लावला आहे. त्यानुसारआज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला-संकुलामध्ये मेट्रो 10,11,12 या तीन मार्गिकांचे भूमिपूजन करण्यात आले. या तीन मेट्रो मार्गिकांसह मेट्रो भवनचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल.
भाजपसाठी मेट्रो प्रकल्प हा मुबंईतील महत्वकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे. जे आधीच्या राज्य सरकारला जमले नाही ते आम्ही करून दाखवले असे दाखवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा असेल. Body:गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो-१० आणि कल्याण ते तळोजा मेट्रो-१२ महानगर प्रदेशातील चाकरमान्यांसाठी तर वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मेट्रो-११ ही मार्गिका वडाळ्याहून दक्षिण मुंबईकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी उपयोगी ठरणार आहे.

मेट्रो भवन ही इमारत 154 मीटर उंच असून 32 मजले यात असणार आहेत. या इमारतीमधून ३३७ किमी
लांबीच्या मेट्रो मार्गिकांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

बीकेसीमध्ये मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेला पहिला मेट्रो कोच देखील प्रदर्शनासाठी ठेवलेला आहे.

Conclusion:
Last Updated : Sep 7, 2019, 12:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.