ETV Bharat / bharat

जी २० परिषद : ट्रम्प आणि मोदींची भेट, 'या' प्रमुख मुद्द्यांवर चर्चा - Osaka

जपानमधील ओसाका या ठिकाणी जी २० परिषद सुरू झाली आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली.

नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
author img

By

Published : Jun 28, 2019, 8:40 AM IST

Updated : Jun 28, 2019, 11:17 AM IST

ओसाका - जपानमधील ओसाका या ठिकाणी जी २० परिषद सुरू झाली आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीमध्ये उभय देशांदम्यानचे संबंध, सुरक्षा, 5G, अमेरिका - इराण संबंध, या चार प्रमुख मुद्दयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

शुक्रवारी यूएस-जपान-भारत यांच्या त्रिपक्षीय बैठकीला सुरुवात झाली आहे. बैठकीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानी पंतप्रधान शिन्जो आबे सहभागी झाले आहेत. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन , फ्रांस अध्यक्ष इमैनुएल मैक्रों आणि ऑस्ट्रेलियाचे राष्ट्राध्यक्ष यांची भेट घेऊ शकतात. जी -20 या परिषदेव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी दोन वेगवेगळ्या त्रिपक्षीय बैठकीत सहभागी होतील. या बैठकीत रशिया-भारत-चीन आणि यूएस-भारत-जपानच्या नेत्यांचा एका मंचावर एकत्र आणण्याचा एक कार्यक्रम आहे.

आज या परिषदेमध्ये मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आहे. या भेटीत नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. 'भारतातील लोकसभा निवडणुका झाल्या, लागलेल्या निकालानंतर तुम्ही मला फोन करून अभिनंदन केलेत, यामुळे मी तुमचा आभारी आहे', असे मोदी यांनी म्हटले आहे. माझ्या दुसऱ्या कारकीर्दीच्या सुरवातीलाच तुमची भेट झाल्याने मला आनंद झाला आहे, असे देखील मोदी यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचे कौतूक केले आहे. 'आपली भेट झाली तेव्हा बऱ्याच गटामध्ये वाद होता. आता मात्र तो वाद निवळला असून त्यांच्या दरम्यान चांगले संबध आहेत', असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

भारताने लादलेले आयात कर मान्य नसल्याचं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच केले होते. डोनाल्ड ट्रम्प त्या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत.

जी-20 परिषदेत कोण-कोणते देश
जी -20 परिषदेत भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, यूके आणि अमेरिका यांचा समावेश आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 28, 2019, 11:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.