नवी दिल्ली- लडाख मध्ये भारत-चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सीमा, सुरक्षा, रणनिती या मुद्द्यावंर बोलताना विचार करुन बोलायला हवे. तसेच मोदींनी त्यांच्या वक्तव्याचा फायदा चीनला त्यांच्या समर्थानासाठी करण्याची संधी देऊ नये', असे मनमोहन सिंह यांनी म्हटले आहे. सर्वपक्षीय बैठकीत नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
-
पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह जी की महत्वपूर्ण सलाह। भारत की भलाई के लिए, मैं आशा करता हूँ कि PM उनकी बात को विनम्रता से मानेंगे। pic.twitter.com/0QTewzmcyD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह जी की महत्वपूर्ण सलाह। भारत की भलाई के लिए, मैं आशा करता हूँ कि PM उनकी बात को विनम्रता से मानेंगे। pic.twitter.com/0QTewzmcyD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 22, 2020पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह जी की महत्वपूर्ण सलाह। भारत की भलाई के लिए, मैं आशा करता हूँ कि PM उनकी बात को विनम्रता से मानेंगे। pic.twitter.com/0QTewzmcyD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 22, 2020
आपल्या देशांच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी 20 जवान हुतात्मा झाले आहेत. त्या जवानांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. केंद्र सरकारने या प्रकरणात मोठी पावले उचलली पाहिजेत, असे मनमोहन सिंह म्हणाले आहेत. याबाबत सरकार कमी पडले तर जनतेचा विश्वासघात केल्यासारखे होईल, असेही त्यांनी म्हटले.
आपण इतिहासाच्या एका टप्प्यावर आहोत. सरकारने घेतलेले निर्णय आणि केलेली कारवाई यावर येणाऱ्या पिढ्या आपल्याबद्दल मत ठरवतील, असे मनमोहन सिंह यांनी म्हटले आहे. जे देशाचे नेतृत्त्व करत आहेत, त्यांच्या खांद्यावर कर्तव्य निभावण्याची मोठी जबाबदारी आहे. आपल्या लोकशाहीत ही जबाबदारी पंतप्रधानांवर असते, असे मनमोहन सिंह यांनी सांगितले आहे.
पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलताना, शब्द वापरताना नेहमीच काळजी घेतली पाहिजे. कारण याचा परिणाम आपल्या रणनीती आणि प्रादेशिक हितांवरही होत असतो, असेही मनमोहन सिंह यांनी सांगितले आहे.
भारत चीनच्या धमक्यांसमोर झुकणार नाही, देशाच्या सार्वभौमत्व आणि एकतेशी कोणताही समझोता करणार नाही. मात्र, पंतप्रधानांनी त्यांच्या वक्तव्यांनी चीनला तशी संधी देऊ, नये असेही मनमोहन सिंह म्हणाले. सीमेवरील परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी देखील प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.