ETV Bharat / bharat

मोदींच्या स्वीय सचिवांची जागतिक बँकेत नेमणूक, इतरही अधिकाऱ्यांच्या बदल्या - World Trade Organisation

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर आर्थिक संकट उभे राहीले आहे. अशा परिस्थितीत जागतिक व्यापार संघटनेतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका अति महत्वाच्या समजल्या जात आहेत.

जागतिक बँक
जागतिक बँक
author img

By

Published : Jun 4, 2020, 10:33 PM IST

नवी दिल्ली - वरिष्ठ सनदी अधिकारी राजीव तोपनो यांची जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते याआधी पंतप्रधान मोदींचे स्वीय सचिव म्हणून काम पाहत होते. तोपनो हे 1996 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत.

याशिवाय, ब्रिजेंद्र नवनीत यांची जागतिक व्यापार संघटनेत स्थायी प्रतिनिधी पदी आणि भारताचे दुतावास म्हणून नेमणूक केली आहे. ते पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होते. नवनीत हे 1999 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. जागतिक व्यापार संघटनेचे कार्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत जागतिक व्यापार संघटनेतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका अतिमहत्वाच्या समजल्या जात आहेत. व्यापार आणि आर्थिक विषयांबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.

इतरही पाच अधिकाऱ्यांच्या विविध जागतिक स्तरावरील संस्थांमध्ये नेमणुक करण्यात आली आहे.

वरिष्ठ सनदी अधिकारी रवी कोटा याची नेमणुक वॉशिंग्टनमधील दुतावासात भारतीय आर्थिक (मंत्री) म्हणून करण्यात आली आहे.

लेखन ठक्कर यांची नेमणूक बिजिंगमधील भारतीय दुतावासात इकॉनॉमिक कौन्सिलर म्हणून करण्यात आली आहे.

एच. अथेली, भारतीय अकाऊंन्टस सर्व्हिसेसमधील अधिकाऱ्यांची नेमणूक आशियायी विकास बँकेत सल्लागार म्हणून करण्यात आली आहे.

अन्वर हुसेन शेख - जागतिक व्यापार संघटनेत सल्लागार

एन. अशोक कुमार - बेल्जियममधील दुतावासात उद्योग आणि अभियांत्रिकीचे सल्लागार म्हणून नेमणूक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.