कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पश्चिम बंगाल दौऱ्याचा आज (रविवार) दुसरा दिवस आहे. आज सकाळी मोदींनी हावडा येथील रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठाला भेट दिली. यावेळी मोदींनी रामकृष्ण परमहंस यांचे दर्शन घेत मठाच्या प्रार्थनेमध्ये सहभाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरही भाष्य केले.
'मी पुन्हा सांगतो, नागरिकत्व सुधारणा कायदा नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही तर नागरिकत्व देण्यासाठी आहे, असे मोदी म्हणाले. पाकिस्तानात अत्याचार होत असलेल्या अल्पसंख्य नागरिकांना भारताने नागरिकत्व दिले पाहिजे, असे महात्मा गांधी आणि इतर मोठ्या नेत्यांना वाटते होते, असे ते म्हणाले. काही व्यक्ती यावरून राजकीय खेळ खेळत असून लोकांना चुकीची माहिती देत आहेत, असे मोदी म्हणाले.
-
#WATCH West Bengal: Prime Minister Narendra Modi joins morning prayers at Belur Math,Howrah pic.twitter.com/bL4mPfGMGe
— ANI (@ANI) January 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH West Bengal: Prime Minister Narendra Modi joins morning prayers at Belur Math,Howrah pic.twitter.com/bL4mPfGMGe
— ANI (@ANI) January 12, 2020#WATCH West Bengal: Prime Minister Narendra Modi joins morning prayers at Belur Math,Howrah pic.twitter.com/bL4mPfGMGe
— ANI (@ANI) January 12, 2020
काल मोदींनी हावडा पुलावरील लाईट आणि साऊंड शोचे उद्घाटन केले. त्यानंतर ते संध्याकाळीच बेलूर मठात मुक्कामासाठी आले होते, संध्याकाळी त्यांनी मठातील संतांशी चर्चा केली होती. आजही त्यांनी मठात उपस्थित लोकांना संबोधित केले.
'बेलूर मठात येणं म्हणजे तीर्थयात्रेला जाण्यासारखे आहे. इथं मला रहायला मिळालं हे माझं नशीब आहे. यासाठी त्यांनी बेलूर मठ आणि पश्चिम बंगाल सरकारचे आभार मानले. स्वामी विवेकानंदाचे विचार आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. 'मला शंभर उत्साही तरुण द्या, मी भारत बदलून दाखवतो'. आपल्यातील उर्जा आणि कामाप्रतीची आवड बदल घडवून आणण्यासाठी गरजेची असल्याचे मोदी म्हणाले.' सकाळी ११ वाजता मोदी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या १५० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मोदींनी काल बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही चर्चा केली.