कोलकाता - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात पश्चिम बंगालमध्ये तीव्र निदर्शने होत असतानाच पंतप्रधान मोदी राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आज जाणार आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये मोदी नूतनीकरण करण्यात आलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे उद्धाटन करणार आहेत. तसेच 'कोलकाता पोर्ट ट्रस्ट'ला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत.
पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था - मोदींचा बंगाल दौरा
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये तीव्र निदर्शने होत असतानाच पंतप्रधान मोदी राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आज जाणार आहेत. राज्यात मोदींविरोधात आंदोलन होण्याची शक्यता पाहता कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
कोलकाता - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात पश्चिम बंगालमध्ये तीव्र निदर्शने होत असतानाच पंतप्रधान मोदी राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आज जाणार आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये मोदी नूतनीकरण करण्यात आलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे उद्धाटन करणार आहेत. तसेच 'कोलकाता पोर्ट ट्रस्ट'ला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत.
पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्
कोलकाता - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये तीव्र निदर्शने होत असतानाच पंतप्रधान मोदी राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आज जाणार आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये मोदी नूतनीकरण करण्यात आलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे उद्धाटन करणार आहेत. तसेच 'कोलकाता पोर्ट ट्रस्ट'ला दिडशे वर्ष पूर्ण होत असल्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत.
हावडा पुलावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या 'लाईट अॅड साऊंड शोचे' उद्धाटनही मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यानंर बेलूर येथील रामकृष्णा मठालाही मोदी भेट देणार आहेत.
मोंदीच्या दौऱयात आंदोलन होण्याची शक्यता ध्यानात घेवून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आले आहे. काही संघटना विमान तळावर मोदींना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याच्याही तयारीत आहेत. मोदींच्या बंगाल भेटीला सोशल मिडियामधूनही विरोध होत आहे. 'गो बॅक मोदी' असा हॅशटॅग ट्विटरवर चालवण्यात येत आहे.
मोदींना कोलकाता विमानतळाबाहेर येऊ देणार नसल्याची तयारी आंदोलनकारी करत आहेत, अशी भीती भाजप खासदार स्वपन दास गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.