ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींचा महत्त्वाकांक्षी 'सी-प्लेन प्रोजेक्ट'; गुजरातमध्ये तयारीला वेग

३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असून त्यानिमित्ताने गुजरातमध्ये आयोजित 'राष्ट्र एकता परेड'मध्ये मोदी सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी साबरमती नदीतून सीप्लेन सेवेचा शुभारंभ करणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा 'ड्रीम प्रोजेक्ट' आहे.

seaplane
सी-प्लेन प्रोजेक्ट
author img

By

Published : Oct 14, 2020, 8:02 AM IST

अहमदाबाद - गुजरात राज्यात तीन नोव्हेंबरला विधानसभेच्या आठ जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा गुजरात दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मोदी ३० ऑक्टोबरला अहमदाबादला जाणार आहेत. ३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असून 'राष्ट्र एकता परेड'मध्ये ते सहभाग घेणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी साबरमती नदीतून सी-प्लेन सेवेचा शुभारंभ करणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा 'ड्रीम प्रोजेक्ट' आहे.

30 ऑक्टोबरला पंतप्रधान अहमदाबादेत येतील. ते गांधीनगरमध्ये राज्यपालांच्या निवासस्थानी मुक्काम करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी त्यांची आई हीराबेन यांची भेट घेण्यासाठीही जाण्याची शक्यता आहे. सरदार सरोवर जवळील केवडिया कॉलीनी येथे आयोजित एकता परेडमध्ये सहभाग घेण्यासाठी मोदी ३१ ऑक्टोबरला सी-प्लेनने जातील.

सी-प्लेन प्रोजेक्ट

महत्त्वाची गोष्ट अशी की, पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा राजकीय लाभ ऊठविण्याचा प्रयत्न गुजरात भाजप करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी कोणत्याही निवडणूक रॅलीत सहभागी होणार नाहीत. अद्याप पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींच्या दौऱ्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

पंतप्रधान मोदींच्या संभाव्य दौऱ्याच्या तयारीसाठी ९ ऑक्टोबरला गांधीनगरमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गृह विभाग, पोलीस आणि सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

सी- प्लेन योजनेची अहमदाबादेत तयारी सुरू

साबरमती महत्त्वाकांक्षी अशा सी- प्लेन योजनेचा एक महत्त्वाचा भाग बनत आहे. वसना बॅरेजवर आंबेडकर पुलाजवळ सी प्लेन उतरविण्याची जोरदार तयारी सुरू आहे. कोरोना प्रसाराच्या काळात अहमदाबाद महापालिका प्रशासनाची कामे थंड पडली होती. मात्र, सी प्लेन उतरण्याच्या तयारीत पालिका प्रशासन व्यग्र्य झाले आहे. सी-प्लेन कोठे उतरणार कोठून, टेक ऑफ करणार या जागेची मार्किंग करण्यात आली आहे. तसेच जवळील सर्व परिसराची रंगरंगोटी करण्यात येत आहे.

सीप्लेन फक्त अहमदाबादसाठी नाही तर संपूर्ण देशासाठी कुतुहलतेचा विषय आहे. 31 ऑक्टोबरपासून पहिल्यांदाच ही सेवा सुरू होत आहे. नागरी उड्डाण विभागाने साबरमती नदी, नर्मदा जयाशय, धारोई जयाशय आणि तापी नदीत सी-प्लेन उतरण्यास परवानगी दिली आहे.

सी-प्लेनबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी

सीप्लेनची पहिली यात्रा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवशी साबरमती नदी ते नर्मदा नदीवरील 'स्ट्यॅच्यू ऑफ लिबर्टी'पर्यंत होणार आहे. यासाठी कॅनडातून दोन सी-प्लेन आयात करण्यात आले आहेत. २० ऑक्टोबरपर्यंत विमाने येण्याची शक्यता आहे. या विमानांत १८ जणांची बसण्याची क्षमता असून यात दोन पायलट आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. एकूण १४ पर्यटक यात बसू शकतात.

सी-प्लेन सेवेचा उद्देश

पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी भारतात सी प्लेन सेवेचा विस्तार करण्यात येत आहे. देशातील जलमार्ग विकसित करण्याच्या योजनेचा हा भाग आहे. अहमदाबादवरून केवडिया कॉलीनी हे २२० किमीचे अंतर पार करण्यास रस्त्याने दोन तासांचा अवधी लागतो. मात्र, सी- प्लेनने हे अंतर फक्त ४५ मिनिटांत पार करता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.