नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 च्या अंतिम फेरी सोहळ्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. या प्रसंगी ते विद्यार्थ्यांशीही संवाद साधतील.
यंग इंडिया प्रतिभेने भरलेला आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हे आदर्श आणि नाविन्यपूर्ण कंपन्यांसाठी एक मोठे मंच म्हणून उदयास आले आहे. देशातील युवा कोविडनंतरच्या जगावर लक्ष केंद्रीत करीत असून आत्मानिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करत आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले.
दरम्यान हॅकेथॉनच्या अंतिम फेरी सोहळ्याला मोदी शनिवारी सायंकाळी 4.30 वाजता संबोधत करतील. 3 ऑगस्टपर्यंत चालणारा हा हॅकेथॉन जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. देशभरातील विविध सरकारी यंत्रणा आणि खासगी कंपन्यांनी दिलेल्या 243 समस्यांवर देशभरातील 10 हजार विद्यार्थी उत्तर शोधणार आहेत.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हा एक देशव्यापी उपक्रम आहे. जो विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या मोठ्या समस्या सोडविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देतो. तसेच उत्पादनांच्या नाविन्यपूर्ण संस्कृतीला प्रोत्साहन देतो आणि समस्येचे निराकरण करण्याची मानसिकता विकसित करतो. तरुण वर्गाला वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने याचा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला आहे.