ETV Bharat / bharat

बोडो शांतता कराराने आसाममध्ये नवी पहाट उजाडेल; बोडोलँडला दीड हजार कोटींचे पॅकेज - कोक्राझार मोदी भाषण

अनेक दशकांपासून आसाममध्ये हिंसाचार सुरू होता. आसामममध्ये शांतात प्रस्थापित होत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. बोडो स्टुडंट युनियन, नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रँट ऑफ बोडोलँड आणि बोडोलँड टेरिटोलियल काउन्सिल या संघटनांमधील सर्व तरुण आणि सदस्यांचे मोदींनी आभार मानले.

pm modi speech at kokrajhar
पंतप्रधान मोदी बोलताना
author img

By

Published : Feb 7, 2020, 3:44 PM IST

Updated : Feb 7, 2020, 3:54 PM IST

नवी दिल्ली - बोडो करारावर सह्या झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रथमच आसाम राज्याला भेट दिली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा पास झाल्यानंतरही मोदींची ही पहिलीच भेट आहे. मोदींनी आसाममधील बोडो प्रदेशातील कोक्राझार जिल्ह्यात जाहीर सभा घेतली. ईशान्य पूर्वेमध्ये आता कोणत्याही नागरिकाचा हिंसाचारात मृत्यू होणार नाही. इशान्येकडील राज्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

  • PM Modi: Today is the day to acknowledge the support of all the young people belonging to All Bodo Students Union (ABSU), National Democratic Front of Bodoland (NDFB), BTC Chief Hagrama Mohilary & Assam Govt, who played a very positive role for this agreement. #BodoPeaceAccord pic.twitter.com/s6eYrq24vN

    — ANI (@ANI) February 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
आसाममधील नागरिकांच्या इच्छाशक्तीमुळे शांतता प्रस्थापित झाली आहे. गांधीजींचे १५० वे जयंती वर्ष साजरे करत असतानाच बोडो शांतता करारावर सह्या झाल्या. ज्या हजारो तरुणांनी हिंसेचा मार्ग पत्करला होता, आता ते घरी आले आहेत. मुले घरी आल्याने अनेक माता मला आशीर्वाद देत आहेत, असे मोदी म्हणाले.

बोडो शांतता करार झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी बोडो प्रदेशाला दीड हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. अनेक दशकांपासून आसाममध्ये हिंसाचार सुरू होता. आसामममध्ये शांतात प्रस्थापित होत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. बोडो विद्यार्थी संघटना, 'नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रँट ऑफ बोडोलँड' आणि 'बोडोलँड टेरिटोलियल काउन्सिल' या संघटनांमधील सर्व तरुण आणि सदस्यांचे त्यांनी आभार मानले.

  • PM Modi in Kokrajhar, Assam: I welcome all those who were part of the Bodo Land Movement and have joined the mainstream. After five decades, with full harmony, the expectations and aspirations of every partner associated with the Bodo Land Movement have been respected. pic.twitter.com/evIVVqoTzu

हजारो नागरिक स्वत:च्याच भूप्रदेशात निर्वासितांसारखे राहिले. मात्र, आता त्यांना सोईसुविधा मिळणार आहेत. पहिले नागरिक ईशान्येकडील राज्यांमध्ये येण्यास घाबरायचे. मात्र, आता ते ईशान्येकडील राज्यांना पर्यटन स्थळ म्हणून पाहत आहेत. आम्ही सत्तेत येण्याआधी ईशान्यकडील राज्ये लष्करी वर्चस्वाखाली होती. मात्र, आम्ही सत्तेत आल्यानंतर त्रिपुरा, मिझोराम, मेघालय, अरुणाचल प्रदेश येथून लष्कराला विशेष अधिकार देणारा 'अफ्सा' कायदा रद्द करण्यात आला आहे.

सरकार आता बोडो करारातील ६ वा क्लॉज (आर्टिकल) लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. या करारामुळे प्रदेशात कायमची शांतता प्रस्थापित झाली आहे. आसाम सरकारने नुकतेच गृह मंत्रालयाच्यावतीने बोडो बंडखोरांसोबत शांतता करारावर सह्या केल्या. या करारानंतर दीड हजार बंडखोरांनी आत्मसमर्पन केले. नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रँट ऑफ बोडोलँड या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या सदस्यांनीही आत्मसमर्पन केले. मागील ५० वर्षांपासून बोडो भागातील विविध गट वेगळ्या राज्याची मागणी करत होते. त्यामुळे आत्तापर्यंत हजारो जणांचा मृत्यू झाला आहे.

Intro:Body:

'बोडो कराराने आसाममध्ये नवी पहाट उजडेल'

नवी दिल्ली - बोडो करारावर सह्या झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रथमच आसाम राज्याला भेट दिली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा पास झाल्यानंतरही मोदींची ही पहिलीच भेट आहे. मोदींनी आसाममधील बोडो प्रदेशातील कोक्राझार जिल्ह्यात जाहीर सभा घेतली. ईशान्य पूर्वेमध्ये आता कोणत्याही नागरिकाचा हिंसाचारात मृत्यू होणार नाही. इशान्येकडील राज्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मोदी  यावेळी म्हणाले.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आसाममधील नागरिकांच्या इच्छाशक्तीमुळे शांतता प्रस्थापित झाली आहे. गांधींजींचे १५० वे जयंती वर्ष साजरे करत असतानाच बोडो शांतता करारावर सह्या झाल्या. ज्या हजारो तरुणांनी हिंसेचा मार्ग पत्करला होता, आता ते घरी आले आहेत. मुले घरी आल्याने अनेक माता मला आशिर्वाद देत आहेत. बोडो शांतता करार झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी बोडो प्रदेशाला दीड हजार कोटींची मदत जाहीर केली आहे.

अनेक दशकांपासून आसाममध्ये हिंसाचार सुरू होता. आसामममध्ये शांतात प्रस्थापित होत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. बोडो स्टुडंट युनियन, नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रँट ऑफ बोडोलँड आणि बोडोलँड टेरिटोलियल काउन्सिल या संघटनांमधील सर्व तरुण आणि सदस्यांचे त्यांनी आभार मानले.      

हजारो नागरिक स्वत:च्याच भूप्रदेशात निर्वासितांसारखे राहिले. मात्र, आता त्यांना सोईसुविधा मिळणार आहेत. पहिले नागरिक ईशान्येकडील राज्यांमध्ये येण्यास घाबरायचे. मात्र, आता ते ईशान्येकडील राज्यांना पर्यटन स्थळ म्हणून पाहत आहेत. आम्ही सत्तेत येण्याआधी ईशान्यकडील राज्ये लष्करी वर्चस्वाखाली होती. मात्र, आम्ही सत्तेत आल्यानंतर त्रिपूरा, मिझोराम, मेघालय, अरुणाचल प्रदेश येथून लष्कराला विशेष अधिकार देणारा अफ्सा कायदा रद्द करण्यात आला आहे.

सरकरा आता बोडो करारातील ६ वा क्लॉज( कलम) लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. या करारामुळे प्रदेशात कायमची शांतता प्रस्थापित झाली आहे. आसाम सरकारने नुकतेच गृह मंत्रालयाच्यावतीने बोडो बंडखोरांसोबत शांतता करारावर सह्या केल्या. या करारानंतर दीड हजार बंडखोरांनी आत्मसमर्पन केले. नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रँट ऑफ बोडोलँड या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या सदस्यांनीही आत्मसमर्पन केले. मागील ५० वर्षांपासून बोडो भागातील विविध गट वेगळ्या राज्याची  मागणी करत होते. त्यामुळे आत्तापर्यंत हजारो जणांचा मृत्यू झाला आहे.

Conclusion:
Last Updated : Feb 7, 2020, 3:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.