ETV Bharat / bharat

मोदींनी शांततेला संधी द्यावी, इम्ररान खानचा भारतालाच सल्ला

मोदींनी शांततेला संधी द्यावी, असे म्हणत भारतालाच शांतता राखण्याचा सल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्ररान खान यांनी दिला आहे.

author img

By

Published : Feb 25, 2019, 11:14 AM IST

नवी

इस्लामाबाद/नवी दिल्ली - मोदींनी शांततेला संधी द्यावी, असे म्हणत भारतालाच शांतता राखण्याचा सल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्ररान खान यांनी दिला आहे. पुलवामा हल्ल्याची भारताने कारवाई करण्यायोग्य काही गुप्त माहिती पुरवल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करु अशी बतावणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, दहशतवादाच्या विरोधा सर्व जगाची ढोबळ सहमती आहे. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी आम्ही आता कडक पाऊले उचलणार आहोत. यावेळी हिशोब होणार आणि बरोबरीतच होणार. हा बदललेला भारत आहे, या दुखण्याला कधीही सहन केले जाऊ शकत नाही. दहशतवादाला कसे ठेचायचे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. या त्यांच्या वक्तव्यानंतर इम्ररान खान यांनी शांततेला संधीदेण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार इम्ररान खान त्यांच्या या शब्दावर ठाम आहेत. भारताकडून पुलवामा हल्ल्याची काही कारवाई करण्यायोग्य माहिती मिळाल्यास तत्काळ पाऊले उचलली जातील. निवेदनात पंतप्रधान मोदींनीशांततेलासंधी द्यायला हवी, असे म्हटले आहे.

यापूर्वी १९ फेब्रुवारीलाही खान यांनी पुलवामा हल्ल्यातील दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन भारताला दिले होते. यासाठी त्यांनी पुलवामा हल्ल्याची माहिती देण्याची मागणी केली होती. या घटनेनंतर भारत बदला घेणार असल्याच्या वृत्तांवर त्यांनी आव्हान दिले होते.

undefined

Intro:Body:

इम्ररान खानचे मोदींना आवाहन, 'शांतता राखण्याची एक संधी द्या'

इस्लामाबाद/नवी दिल्ली - भारताताने शांतता राखण्याची आम्हाला एक संधी द्यावी. या शब्दावर आम्ही ठाम राहू, असे इम्ररान खान यांनी पंतप्रधान मोदींना विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय पुलवामा हल्ल्याची भारताने कारवाई करण्यायोग्य काही गुप्त माहिती पुरवल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाईल.  

पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, दहशतवादाच्या विरोधा सर्व जगाची ढोबळ सहमती आहे. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी आम्ही आता कडक पाऊले उचलणार आहोत. यावेळी हिशोब होणार आणि बरोबरीतच होणार. हा बदललेला भारत आहे, या दुखण्याला कधीही सहन केले जाऊ शकत नाही. दहशतवादाला कसे ठेचायचे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. या त्यांच्या वक्तव्यानंतर इम्ररान खान यांनी शांतता राखण्याची एक संधी देण्याची मागणी केली आहे.    

पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार इम्ररान खान त्यांच्या या शब्दावर ठाम आहेत. भारताकडून पुलवामा हल्ल्याची काही कारवाई करण्यायोग्य माहिती मिळाल्यास तत्काळ पाऊले उचलली जातील. निवेदनात पंतप्रधान मोदींनी आम्हाला शांतता राखण्यासाठी एक संधी द्यायला हवी, असे म्हटले आहे.

यापूर्वी १९ फेब्रुवारीलाही खान यांनी पुलवामा हल्ल्यातील दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन भारताला दिले होते. यासाठी त्यांनी पुलवामा हल्ल्याची माहिती देण्याची मागणी केली होती. या घटनेनंतर भारत बदला घेणार असल्याच्या वृत्तांवर त्यांनी आव्हान दिले होते. मात्र, भारताकडून खान यांच्या नव्या वक्तव्याला 'नाटकी' असे म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.