कोलकाता - पंतप्रधान मोदींनी आज (रविवारी) कोलकाता पोर्ट ट्रस्टचे नामकरण डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी केल्याची घोषणा केली. कोलकाता पोर्ट ट्रस्टला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मोदींनी ही घोषणा केली. या कार्यक्रमाला बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहिल्या नाहीत.
-
PM Narendra Modi at the inauguration of 150th anniversary celebrations of Kolkata Port Trust: This port will now be known as Syama Prasad Mukherjee port. #WestBengal pic.twitter.com/CEuzDWt8E0
— ANI (@ANI) January 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">PM Narendra Modi at the inauguration of 150th anniversary celebrations of Kolkata Port Trust: This port will now be known as Syama Prasad Mukherjee port. #WestBengal pic.twitter.com/CEuzDWt8E0
— ANI (@ANI) January 12, 2020PM Narendra Modi at the inauguration of 150th anniversary celebrations of Kolkata Port Trust: This port will now be known as Syama Prasad Mukherjee port. #WestBengal pic.twitter.com/CEuzDWt8E0
— ANI (@ANI) January 12, 2020
'कोलकात्याचे हे बंदर एक प्रकारे भारताच्या औद्योगिक, आध्यात्मिक आणि स्वावलंबी असण्याचे प्रतीक आहे. हे बंदर दीडशेव्या वर्षात पदार्पण करत आहे. आता याला 'न्यू इंडिया'चे प्रतीक बनवणे आवश्यक आहे,' असे मोदी म्हणाले.
'डॉ. मुखर्जी यांनी भारतात औद्योगिकीकरणाचा पाया घातला होता. त्यांनी चित्तरंजन लोकोमोटिव्ह फॅक्टरी, हिंदुस्तान एयरक्राफ्ट फॅक्टरी, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन आणि अनेक लोकांसह त्यांनी सक्रिय भागीदारी केली. त्यामुळे आज या बंदराचे नाव मी 'कोलकाता पोर्ट ट्रस्ट बदलून डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट असे करतो. मुखर्जी हे विकासासाठी काम करणारे नेते होते. त्यांनी 'वन नेशन, एक संविधान' या विचारासाठी मोठे योगदान दिले,' असेही मोदी म्हणाले.