ETV Bharat / bharat

'कठीण परिस्थितीचा सामना करून त्यावर विजय मिळवला पाहिजे, ही बुद्धांची शिकवण'

author img

By

Published : May 7, 2020, 11:48 AM IST

मोदींनी देशवासियांना बोद्ध पोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. 'भगवान बुद्धांनी भारताची संस्कृती समृद्ध केली. त्यांनी आपल्या जीवनयात्राद्वारे इतरांचे जीवन प्रकाशमय केले. कठीण परिस्थितीचा निरंतर सामना करून त्यावर विजय मिळवला पाहिजे, ही शिकवण भगवान बुद्धांनी दिली. ती आपण आज अंमलात आणण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Modi on Buddha Pournima
PM Modi on Buddha Pournima

नवी दिल्ली - बुद्ध पौर्णिमेनिमित्त आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेच्या सहकार्यातून सांस्कृतिक मंत्रालयात आज कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. यावेळी मोदींनी देशवासियांना बोद्ध पोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. 'भगवान बुद्धांनी भारताची संस्कृती समृद्ध केली. त्यांनी आपल्या जीवनयात्राद्वारे इतरांचे जीवन प्रकाशमय केले. कठीण परिस्थितीचा निरंतर सामना करून त्यावर विजय मिळवला पाहिजे, ही शिकवण भगवान बुद्धांनी दिली. ती आपण आज अंमलात आणण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

कोरोना संकटात अनेक लोक २४ तास करत आहेत. या लोकांचे आभार मानने गरजेचे आहे. आपण वैश्विक दायित्यावाचे पालन केले असून कोरोना संकटात इतर देशांना मदत केली आहे. भारत नि: स्वार्थपणे कोरोना संकटात अडकलेल्या प्रत्येकासोबत उभा आहे, असे मोदी म्हणाले.

वेळ, परिस्थिती बदलली, मात्र भगवान बुद्धाच्या विचारानंना आपल्या जिवनात विशेष स्थान आहे. भगवान बुध्द म्हणजे, एक पवित्र विचार असून समर्पणाची भावना आहेत. कोरोना संकटात प्रत्येक जण लढा देत आहे. या संकटात बुद्धाची शिकवण महत्त्वाची आहे. बुद्धांनी सांगितलेले करुणा, दया, समभाव आणि स्वीकार हे चार मार्ग भारतासाठी प्रेरणादायी आहेत, असे मोदी म्हणाले.

मनुष्याने कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत, त्याच्यातून बाहेर पडावे. थकून जाणे हा एक पर्याय नाही. आज आपण सर्वजण एका कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एकत्र काम करीत आहोत, असे मोदी म्हणाले.

जगभरातील बौद्ध संघांच्या प्रमुखांसह एका अभासी (व्हर्च्युअल) प्रार्थना कार्यक्रम आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेच्या सहकार्यातून सांस्कृतिक मंत्रालयात आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम कोरोनापीडित आणि कोरोना विरोधात लढणाऱ्या सैनिकांच्या सन्मानार्थ आयोजीत केला होता. या कार्यक्रमात बिहारमधील बोधगयाचे महाबोधी मंदिर, सारनाथमधील मूलगंधा कुटी विहार, नेपाळमधील पवित्र लुंबिनी गार्डन, कुशीनगरमधील परिनिर्वाण स्तूप या ठिकाणांहूनही थेट प्रक्षेपण झाले.

बुद्ध हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.