ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींनी केले 'सी-प्लेन'चे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडियाजवळील स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट दरम्यान धावणाऱ्या 'सी-प्लेन'चे लोकार्पण केले.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Oct 31, 2020, 3:59 PM IST

केवडीया (गुजरात) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 31 ऑक्टोबर) गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडियाजवळील स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट दरम्यान सी-प्लेनचे अनावरण केले.

मोदींनी येथून सरदार सरोवर धरणाजवळील तलाव -3 येथून विमान प्रवास करत सेवेचे उद्घाटन केले. उद्घाटनापूर्वी मोदींनी या सेवेचा तपशील घेतला. तसेच सी-प्लेनची संपूर्ण माहिती घेतली. सी-प्लेन हे अहमदाबाद ते केवडिया हे 200 किमीचे अंतर केवळ 40 मिनिटांत पार करणार आहे. त्यामध्ये 19 जणांना बसण्याची क्षमता आहे. हे सी-प्लेन 300 मीटरच्या धावपट्टीवर उड्डाण घेऊ शकते.

सी-प्लेनची दररोज अहमदाबाद ते केवडिया या मार्गावर 8 उड्डाणे होणार आहेत. या सी-प्लेनमध्ये प्रवास करण्यासाठी एका प्रवाशाला 4 हजार 800 रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे. विदेशी तज्ज्ञांकडून भारतीय वैमानिकांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सी-प्लेनद्वारे वाहतूक हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

हेही वाचा - देव मुख्यमंत्री झाले तरीही सर्वांना सरकारी नोकरी देणे कठीण; स्वयंपूर्ण मित्र उपक्रमाची सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.