ETV Bharat / bharat

'देशाची अर्थव्यवस्था सर्वनाशाकडे चालली होती, आम्ही स्थिर केली' - Assocham annual meeting

भारताची अर्थव्यवस्था चार- पाच वर्षांपूर्वी सर्वनाशाकडे चालली होती. मात्र, आमच्या सरकारने अर्थव्यवस्था स्थिर केली, तसेच शिस्त आणली - मोदी

modi
पंतप्रधान मोदी
author img

By

Published : Dec 20, 2019, 1:25 PM IST

नवी दिल्ली- भारताची अर्थव्यवस्था चार-पाच वर्षांपूर्वी सर्वनाशाकडे चालली होती. मात्र, आमच्या सरकारने अर्थव्यवस्था स्थिर केली, तसेच शिस्त आणली. उद्योग क्षेत्राच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असेलल्या मागण्यांकडे आम्ही लक्ष दिले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. असोचेम संघटनेच्या वार्षिक सभेत ते बोलत होते.

  • PM Modi: 5-6 years back our economy was heading towards disaster, our Govt has not only stabilized it, but also made efforts to bring discipline to it. We have paid attention to fulfilling the decades old demands of the industry. https://t.co/TztGxFKucu pic.twitter.com/bs8ktFXXeJ

    — ANI (@ANI) December 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

देशाची अर्थव्यवस्था ढासळत असताना मोदींनी असोचेमच्या मंचावरून, असे वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अॅड इंडस्ट्री ऑफ इंडिया म्हणजेच असोचेम या संघटनेच्या वार्षिक बैठकीला संबोधित करत होते. असोचेम संघटना १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने मोदींना आमंत्रित करण्यात आले होते. 'न्यू इंडिया अॅस्पायरिंग फॉर ५ ट्रिलियन इकॉनॉमी' ही या कार्यक्रमाची यावर्षीची थीम आहे. कर गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये पारदर्शकता, जबाबदारीची भावना, आणि कार्यक्षमता आणण्यासाठी आम्ही 'फेसलेस टॅक्स प्रशासन' आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तळागळापासून योजनांमध्ये बदल घडवून आणल्याने तसेच रात्रंदिवस काम केल्याने 'ईझ ऑफ डूईंग बिझनेस' च्या यादीतच भारताचे स्थान वरती आले. अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांमध्ये बदल करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणाचा वापर करत आहोत, असे ही मोदी म्हणाले. देशात एफडीआय म्हणजेच परदेशी थेट गुंतवणूकीचा प्रवाह मागील काही वर्षांमध्ये वाढलेला आहे. एफडीआयचे दोन अर्थ आहेत, एक परदेशी थेट गुंतवणूक आणि दुसरा म्हणजे 'फर्स्ट डेव्हलप इंडिया'. बँकीग क्षेत्र आणि कॉर्पोरेट क्षेत्राला यावेळी बोलताना मोदींनी आश्वस्त केले. देशात गुंतवणूक करण्याचे आवाहन त्यांनी उद्योजकांना केले.

Intro:Body:

देशाची अर्थव्यवस्था सर्वनाशाकडे चालली होती, आम्ही स्थिर केली - पंतप्रधान मोदी   

नवी दिल्ली- भारताची अर्थव्यवस्था चार- पाच वर्षांपूर्वी सर्वनाशाकडे चालली होती. मात्र, आमच्या सरकारने अर्थव्यवस्था स्थिर केली, तसेच शिस्त आणली. उद्योग क्षेत्राच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असेलल्या मागण्यांकडे आम्ही लक्ष दिले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. असोचेम संघटनेच्या वार्षिक सभेत ते बोलत होते.

देशाची अर्थव्यवस्था ढासळत असताना मोदींनी असोचेमच्या मंचावरून, असे वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अॅड इंडस्ट्री ऑफ इंडिया म्हणजेच असोचेम या संघटनेच्या वार्षिक बैठकीला संबोधित करत होते. असोचेम संघटना १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने मोदींना आमंत्रित करण्यात आले होते. 'न्यू इंडिया अॅस्पायरिंग फॉर ५ ट्रिलियन इकॉनॉमी' ही या कार्यक्रमाची यावर्षीची थीम आहे.

 कर गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये पारदर्शकता, जबाबदारीची भावना, आणि कार्यक्षमता आणण्यासाठी आम्ही 'फेसलेस टॅक्स प्रशासन' आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तळागळापासून योजनांमध्ये बदल घडवून आणल्याने तसेच रात्रंदिवस काम केल्याने 'ईझ ऑफ डूईंग बिझनेस' च्या यादीतच भारताचे स्थान वरती आले. अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांमध्ये बदल करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणाचा वापर करत आहोत, असे ही मोदी म्हणाले.

देशात एफडीआय म्हणजेच परदेशी थेट गुंतवणूकीचा प्रवाह मागील काही वर्षांमध्ये वाढलेला आहे. एफडीआयचे दोन अर्थ आहेत, एक परदेशी थेट  गुंतवणूक आणि दुसरा म्हणजे 'फर्स्ट डेव्हलप इंडिया'. बँकीग क्षेत्र आणि कॉर्पोरेट क्षेत्राला यावेळी बोलताना मोदींनी आश्वस्त केले. देशात गुंतवणूक करण्याचे आवाहन त्यांनी उद्योजकांना केले.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.