नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज थायलंडच्या तीन दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले. यादरम्यान ते दक्षिण आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटनेच्या आसियान परिषदेत सहभागी होतील. ही १६ वी आसियान परिषद आहे. ते भारत, पूर्व आशिया आणि क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागीदारी परिषदेतही (आरसीईपी) सहभागी होतील. लेंगे. पंतप्रधान मोदी २ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत या दौऱ्यावर आहेत.
'पंतप्रधान मोदी थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान ओ चा यांच्या निमत्रंणावरून बँकॉकला निघाले आहेत,' अशी माहिती सचिव विजय ठाकूर यांनी मीडियाला दिली. 'बँकॉकमध्ये आरसीईपी येथे अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. पंतप्रधान आज बँकॉकमध्ये सायंकाळी ६ वाजता तेथील भारतीय समुदायाला संबोधित करतील,' असे त्या म्हणाल्या.
आरसीईपीमध्ये आसियान समूहाचे 10 सदस्य देश ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड, फिलीपीन्स, लाओस आणि व्हिएतनाम हे देश सहभागी होतील. तसेच, त्यांचे ६ एफटीए भागीदार भारत, चीन, जापान, दक्षिण कोरिया , ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हेही या परिषदेत सहभागी होतील. पंतप्रधान मोदींची ही सातवी आसियान-भारत परिषद तर, सहावी पूर्व आशिया परिषद आहे.