ETV Bharat / bharat

पंतप्रधानांना आवडला 'या' मुलीचा सूर, ट्विटरवर केले कौतुक..

author img

By

Published : Oct 10, 2020, 6:17 PM IST

पंतप्रधान मोदी यांनी देविकाच्या कामगिरीची दखल घेत तिचे कौतुक केले. मोदी यांनी देविकाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला. तसेच, देविकाचा मला अभिमान आहे. तिच्या गायनातून 'एक भारत, श्रेष्ठ भारत' ची प्रचिती येत असल्याचे मोदी म्हणाले.

देविका
देविका

कोची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील एका विद्यार्थिनिचे कौतुक केले आहे. या मुलीने हिमाचली गाणे म्हणून देशातील नागरिकांची मने जिकली आहेत. तिचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जाम व्हायरल झाला आहे. देविका असे या मुलीचे नाव आहे.

देविका ही तिरुवनंतपुरमच्या पाट्टोम येथील केंद्रीय विद्यालयात ९व्या वर्गाला शिकते. तिने 'एक भारत, श्रेष्ठ भारत' उपक्रमांतर्गत 'चंबा कितनी की दूर' हे गाणे गायले होते. तिच्या आवाजातील मधुरताही नेटकऱ्यांना चांगलीच भावली. विशेष म्हणजे, देविकाच्या गायनाच्या व्हिडिओची हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दखल घेतली. ठाकूर यांनी देविकाचा व्हिडिओ आपल्या फेसबुक वॉलवर प्रसिद्ध करून तिचे कौतुक केले होते. देविकाने सर्वांची मने जिंकली, अशी प्रशंसा ठाकूर यांनी केली होती.

त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देखील देविकाच्या कामगिरीची दखल घेत तिचे कौतुक केले. मोदी यांनी देविकाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच, देविकाचा मला अभिमान आहे. तिच्या गायनातून 'एक भारत, श्रेष्ठ भारत' ची प्रचिती येत असल्याचे मोदी म्हणाले.

मोदी यांच्या ट्विटनंतर देविकाच्या आनंदाला पारावारच उरलेला नाही. पंतप्रधानांनी तिच्या गायनाचे कौतुक केले, याचा तिला विश्वासच बसेनासा झाला आहे. यावर, हे अविश्वसनीय आहे. मला खूप आनंद होत आहे. हे गाणे गायल्यावर खुद्द पंतप्रधान मोदी माझे अभिनंदन करतील याची मी अपेक्षा केली नव्हती, अशी प्रतिक्रिया देविकाने एका वृत्तवाहिनीला दिली आहे. देविकाने पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहे.

हेही वाचा- 'जवानांसाठी नॉन बुलेट प्रूफ ट्रक अन् मोदींसाठी 8400 कोटींचे जेट'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.