सारण - मुख्यमंत्रीपदाची दावेदार आणि प्लुरल्स पार्टीच्या अध्यक्षा पुष्पम प्रिया यांनी बुधवारी बनियापूर स्पोर्ट्स ग्राऊंड येथे जाहीर सभेला संबोधित केले. त्यांनी प्लुरल्स पार्टीच्या महिला उमेदवार चिकी सिंह यांना मतदान करण्याचे आवाहन केले. पुष्पम प्रिया यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजवटीला 'जंगलराज-2' असे संबोधले आहे. तसेच बिहारमध्ये सरकारची परिभाषा बदलली असल्याचेही म्हटले आहे.
पुष्पम प्रियाने लालू प्रसाद यादव आणि नितीशकुमार यांच्यावर एकाचवेळी हल्लाबोल केला. गेल्या तीस वर्षांपासून या दोघांनी मिळून जनतेचे शोषण केले आहे, लोकसंख्येच्या आधारे विकासदरही खूप कमी झाला आहे. काहींनी जातीय राजाकारण केले तर रोजगाराच्अया नावाने जनतेला लुटले मात्र विकासासाठी पंधरा वर्षे काय कमी होती का? अशी रोखठोक टीका पुष्पम यांनी केली.
जनतेला आवाहन
आम्ही पारदर्शकपणे राजकारण करु. पार्टी एक एक करुन आपली ध्येयधोरणे समोर ठेवेल. पार्टीचा मुलभूत अजेंडा वेबसाईट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणला जाईल असे पुष्पम यांनी स्पष्ट केले. राजकारण स्वच्छ हेतूने आणि विकासाच्या दृष्टीकोनातून केले पाहिजे. प्लुरल्स पार्टीची धमक पाहून सगळ्यांना रोजगार आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची आठवण झाली. सगळ्यात आधी प्लुरल्सने आठ लाख सरकरी नोकऱ्यांबद्दल बोलल्यानंतर इतरांना रोजगाराचे मुद्दे आठवायला लागले, असे त्या म्हणाल्या. प्लुरल्स पार्टी हा एक पर्याय म्हणून सध्या समोर आला आहे, सकारात्मक राजकारण करुन बिहारमध्ये सत्ता स्थापबन करण्याचा आमचा हेतू असून आम्ही 2025पर्यंत भारतातील तर 2030पर्यंत जगातील सर्वश्रेष्ठ राज्य बनवण्याचे धोरण ठेवले आहे. यासाठी आम्हाला तूमच्या प्रेमाची आणि सहकार्याची गरज आहे. असे आवाहन पुष्पम प्रिया यांनी जनतेला केले आहे.
हेही वाचा - बसपाच्या सात आमदारांची हकालपट्टी - मायावतींची माहिती