डेहराडून - राज्यातील भाविक ४ मेपासून केदारनाथ आणि इतर हिमालयीन भागात असलेल्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी येऊ शकतात, असे राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी शनिवारी सांगितले.
४ मेनंतर सरकारने आंतरजिल्हा प्रवासास सशर्त परवानगी दिली आहे. विशेषता जे जिल्हे ग्रीन झोनमध्ये येतात तेथील नागरिक केदारनाथ मंदिरात दर्शनाला येऊ शकतात, असे रावत म्हणाले. मात्र, सोशल डिस्टंसिंगचे पालन करत अतिमहत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
२९ एप्रिलला केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. मात्र, अद्याप भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही. इतर राज्यातील भाविकांना दर्शनासाठी येता येईल का? असे विचारले असता रावत म्हणाले, सध्या सर्व देशामध्ये कोरोनामुळे रस्ते बंद आहेत. त्यामुळे आम्ही परिस्थिती पूर्ववत होण्याची वाट पाहत आहोत.
घरवाल विभागातील चार पवित्र धार्मिक स्थळे हिमालय क्षेत्रामध्ये येत असून सर्व जिल्हे ग्रीन झोनमध्ये मोडतात. येथे आत्तापर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरे उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये येतात. तर केदारनाथ रुद्रप्रयाग जिल्ह्यात मोडत असून बद्रीनाथ चमोली जिल्ह्यात येते.