ETV Bharat / bharat

युपी सामूहिक अत्याचार पीडितेची मृत्यूशी झुंज अयशस्वी; दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास - UP Gang rape victim death

१४ सप्टेंबरला या तरुणीवर अत्याचार झाले होते. ज्यानंतर आरोपींनी तिला मारुन टाकण्याचा प्रयत्नही केला होता. या तरुणीला सुरुवातीला उपचारांसाठी अलीगढच्या जे. एन. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी तिची तब्येत खालावल्याने तिला दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात तिची प्रकृती आणखी ढासळली आणि तिचा मृत्यू झाला.

UP-gang-rape-victim-in-hathras-dies-in-delhi-safdarjung-hospital-during-treatment
हाथरस बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अयशस्वी; दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
author img

By

Published : Sep 29, 2020, 11:01 AM IST

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाला होता. या तरुणीवर दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. १४ सप्टेंबरला या तरुणीवर अत्याचार झाले होते. ज्यानंतर आरोपींनी तिला मारुन टाकण्याचा प्रयत्नही केला होता.

या तरुणीला सुरुवातीला उपचारांसाठी अलीगढच्या जे. एन. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी तिची तब्येत खालावल्याने तिला दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात तिची प्रकृती आणखी ढासळली आणि तिचा मृत्यू झाला.

हाथरसमधील चंदपा भागातील एका गावात ही तरुणी राहत होती. १४ सप्टेंबरला आपल्या आईसोबत शेतात चारा आणण्यासाठी गेली असता तिच्यावर चार नराधमांनी सामूहिक अत्याचार केला होता. यानंतर आरोपींनी तिला मारहाण करत, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर, ती मेली आहे असे समजून चौघे आरोपी तिला तसेच टाकून निघून गेले होते.

तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळपर्यंत तिचा मृतदेह तिच्या गावी आणला जाईल, त्यानंतर गावातच तिच्यावर अंत्यसंस्कार होतील.

हेही वाचा : अंगातील भूत काढण्यासाठी मांत्रिकाची मारहाण; तीन वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.