नवी दिल्ली - मागील १६ दिवसापासून सुरू असलेली पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढ कायम आहे. आज सोमवारी दिल्लीत पेट्रोल ३३ पैशांनी तर डिझेल ५८ पैशांनी वाढले. वाढीव दरानुसार, दिल्लीत पेट्रोल प्रतिलीटर ७९.५६ रुपये तर डिझेल ७८.८५ रुपयांनी विकले जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजार पेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. तसेच कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे केंद्र सरकारने उत्पादन शुल्क तर राज्यांनी वॅट वाढवला आहे. यामुळे तेल कंपन्या दरवाढ करत आहेत.
आजच्या दरवाढीनंतर, मुंबईत पेट्रोलचे दर ८६.३६ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७७.२४ रुपये, चेन्नईत पेट्रोलचे दर ८२.८७ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७६.०३ रुपये प्रति लिटर आणि कोलकात्यात पेट्रोलचे दर ८१.२७ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७४.१४ रुपये प्रति लिटर झाले आहे.
दरम्यान, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तेलाच्या किंमतीमध्ये वाढ करु नये, अशी मागणी पत्रद्वारे केली आहे. कोरोनामुळे संकटात असलेल्या नागरिकांवर इंधन दरवाढीचा भार नको, असे सोनियाने म्हटले आहे.
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊमध्ये जवळपास ८२ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. पण अनलॉक-१ लागू झाल्यापासून दरामध्ये वाढ पाहायला मिळत आहे. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात येतो. तसेच सकाळी सहा वाजल्यापासूनच हे नवे दर लागूही करण्यात येतात.
हेही वाचा - जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; दोघांची ओळख पटली..
हेही वाचा - 'सुमारे 24 कोटी लोकसंख्येच्या उत्तरप्रदेशात फक्त 6 हजार कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण'