नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये (पब्लिक सेफ्टी अॅक्ट-पीएसए) नजरकैदेत ठेवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. त्याविरोधात ओमर अब्दुल्ला यांची बहिण सारा पायलट यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
गेल्या 6 महिन्यांपासून जम्मू काश्मीरचे दोन माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदैत ठेवण्यात आले आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांना ताब्यात घेतले होते. तेव्हापासून श्रीनगरमध्ये ओमर पोलिसांच्या नजरकैदेत आहेत. सहा महिन्यानंतर त्यांचावरील नजरबंदी हटवण्यात येणार होती. मात्र, केंद्र सरकारने सुरक्षा कायद्याअन्वये (पब्लिक सेफ्टी अॅक्ट-पीएसए) त्यांच्यावर पुन्हा नजरबंदी लागू केली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच त्यांचे छायाचित्र व्हायरल झाले होते. त्यामध्ये टोपी घातलेले आणि दाढी वाढलेले ओमर पाहायला मिळाले होते. त्यारून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारवर टीका केली होती. मला ओमर यांच्याविषयी खूप वाईट वाटत आहे. हे सर्व आपल्या लोकशाही शासन पद्धती असलेल्या देशामध्ये होत असून या सर्वांचा अंत कधी होणार आहे', असा सवाल ममता बॅनर्जी यांनी टि्वटमध्ये केला होता.
फारूक अब्दुल्ला यांची मुलगी आणि ओमर अब्दुल्ला यांची बहिण सारा अब्दुल्ला ह्या काँग्रेसचे विश्वासू नेते राजेश पायलट यांचे चिरंजिव यांच्या पत्नी आहेत.