नवी दिल्ली - देशातली सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू होत आहे. मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा प्रारंभ केला. कोरोना लस तयार करण्यासाठी वैज्ञानिक रात्रंदिवस काम करत होते. कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करण्यास सर्वसामान्यपणे जास्त वेळा लागतो. मात्र, भारताने अल्प काळात २ स्वदेशी लसी तयार केल्या. हे भारताच्या सामर्थ्याचे आणि हुशारीचं उदाहरण आहे असे ते म्हणाले.
काय म्हणाले मोदी -
३ कोटी पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च भारत सरकार उचलणार. सुरुवातील आरोग्य कर्चचारी आणि प्राध्यक्रमाच्या कर्मचाऱ्यांना लस मिळणार. 'कोविन अॅप'मध्ये सर्व माहिती जमा असेल. त्याद्वारे दुसरा लसीचा डोस कधी घ्यायचा याची माहिती मोबाईलवर मिळणार. लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहे. एक डोस घेतल्यावर दुसरा डोस घेण्यास विसरू नका. दोन्ही डोस दरम्यान सुमारे महिन्याचा काळ लागेल. त्यानंतर दोन आठवड्यांनी शरिरात प्रतिकारक्षमता तयार होईल. मात्र, लस घेतल्यानंतर निष्काळजीपणा करू नका. मास्क आणि कोरोना नियमावलीचे पालन करा.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी मानवतेप्रती कर्तव्य पार पाडले
कोरोना महामारीने रुग्णांना एकटं पाडलं. ज्यांचा मृत्यू झाला त्यांचे अंत्यसस्कारही नीट करता आले नाहीत. या घटनांमुळे मन उदास होतं. संकटाच्या या काळात काहीजण आशेचा किरण आणत होते. जनतेला वाचवण्यासाठी स्वत:चे जीव धोक्यात घातल होते. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी, पॅरामेडिक्स यांनी मानवतेच्या प्रती कर्तव्य निभावले. यातील अनेक कुटुंबापासून दुर राहिले. अनेक दिवस त्यांना घरी जाता आले नाही. यातील काही जण घरीच जाऊ शकले नाही.
भारतीय लसी विदेशी लसींपेक्षा स्वस्त आणि सुलभ
मेड इन इंडिया कोरोना लस विदेशी लसींच्या तुलनेत स्वस्त आहेत. तसेच त्यांचा वापरही सुलभ आहे. काही विदेशी लसींचा एक डोस ५ हजार रुपयांना आहेत. तसेच त्यांना उणे ८० तापमानात ठेवावा लागतो. याउलट भारतीय लसी इथल्या तापमानाला अनुकूल आहेत. आरोग्य उत्पादनात भारत आत्मनिर्भर झाला आहे.