पाटणा - बिहार निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील ७१ जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी नागरिकांनी आता बिहारच्या विकासात्मक बदलांसाठी मतदान करावे, असे आवाहन केले आहे.
गेल्या १५ वर्षात युवकांना बेरोजगार ठेवण्याचे काम-
तेजस्वी यादव म्हणाले, निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना मला असे सांगावे वाटते की आता त्यांनी बिहारच्या बदलांसाठी मतदान करायला हवे. गेल्या पंधरा वर्षापासून सरकारने युवकांना बेरोजगार ठेवले. शेतकरी आणि मजुरांची स्थिती दयनीय केली आहे. राज्यात उद्योगाचा विकास करण्यास ते सक्षम नव्हते. राज्यातील गरिबी दूर झाली नाही आणि राज्यातील शिक्षण व आरोग्याचा बोजवारा उडाला असल्याचेही पुढे त्यांनी म्हटले आहे.
या निवडणुकीत सर्वात महत्वाचा मुद्दा हा बेरोजगारी आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नुकतेच बिहारच्या पूरग्रस्तांकडेही दुर्लक्ष केले. तसेच राज्यातील अन्य समस्यांकडेही त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पहिल्यांदा मी जनतेला आवाहन करतो की आता त्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करावे.
माझ्या कुटुंबाबद्दल केलेले वक्तव्य माझ्यासाठी आशीर्वादच -
नितीशकुमार यांचे वक्तव्य महत्वाचे नाही आणि त्यांच्या वक्तव्यातूनतच ते सध्या तणावात असल्याचे स्पष्टपणे जाणवत असल्याचेही तेजस्वी यावेळी म्हणाले. त्यांनी माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल केलेले वक्तव्य माझ्यासाठी आशीर्वादच असल्याचे मी मानतो. त्यांनी मागील १५ वर्षात केलेल्या वक्तव्यांचा कोणीही साक्षीदार बनू शकतो. त्यामुळे त्यांचे वक्तव्य काय आहे, हे महत्वाचे नाही. मात्र, आता जनतेने त्यांच्या इतक्या खालच्या स्तरावर घसरण्याची अपेक्षा केली नव्हती. मात्र, राजकीय जाणकारांचे मत आहे की नितीश कुमार सध्या अडचणीत आहेत आणि ते बाहेर फेकले जाऊ शकतात, असे ही तेजस्वी यावेळी म्हणाले.
विकासाच्या मुद्दयांवर मतदान जाती-धर्माच्या नाही-
मला विश्वास आहे, की आम्ही नक्कीच यशस्वी होऊ कारण आम्ही जनतेसोबत ठामपणे उभे आहोत, जी सरकारच्या विरोधात आहे. आज मी १५ सभांना संबोधित करण्यासाठी जात असल्याचेही तेजस्वी यांनी सांगितले. यावेळी जनता विकासाच्या मुद्द्यांवर मतदान करत आहे, जातीधर्माच्या नाही, आम्ही नक्कीच सरकार स्थापन करून एनडीए सत्तेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.