नवी दिल्ली - सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या रखडलेल्या परीक्षा आता जुलैमध्ये होणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याबाबत माहिती जाहीर केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी याबाबत माहिती दिली. एक ते पंधरा जुलैदरम्यान या परीक्षा होणार आहेत, असे त्यांनी जाहीर केले. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक हे सीबीएसई लवकरच जाहीर करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.