ETV Bharat / bharat

दिल्ली पोलिसांनी 10 गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात केले दाखल

लॉकडाऊनमध्येही पोलीस सतत लोकांची मदत करत आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीच्या विविध भागातील 10 महिलांना प्रसुतीसाठी पोलिसांनी रुग्णालयात पोहोचवले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत आतापर्यंत 41 महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.

दिल्ली पोलिसांनी 10 गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात केले दाखल
दिल्ली पोलिसांनी 10 गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात केले दाखल
author img

By

Published : Apr 2, 2020, 12:48 PM IST

नवी दिल्ली - लॉकडाऊनमध्येही पोलीस सतत लोकांची मदत करत आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीच्या विविध भागातील 10 महिलांना प्रसुतीसाठी पोलिसांनी रुग्णालयात पोहोचवले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत आतापर्यंत 41 महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.

दिल्ली पोलिसांनी 10 गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात केले दाखल

पोलीस उपायुक्त शरत सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्चला दुपारी सुभाष कुमार आणि शिपाई रामधन यांना एक फोन आला. खानपूर बस आगाराजवळ एका महिलेला प्रसुतीसाठी न्यायचे असल्याची माहिती मिळाली. पीसीआर त्वरीत घटनास्थळी पोहोचली आणि महिलेला सफदरजंग रुग्णालयात पोहोचवले. अशीच दुसरी घटना 31 मार्चला सकाळी पावणेदहा वाजता रानी बाग परिसरात घडली. महिलेला प्रसुतीपीडा होत असल्याने पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी महिलेला भगवान महावीर रुग्णालयात दाखल केले.

देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दिल्लीच्या निजामुद्दीन येथील कार्यक्रमानंतर देशात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत. यादरम्यान, लॉकडाऊन न जुमानता बाहेर पडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा रात्रंदिवस झटत आहे. तसेच गरजूंना मदत करण्यासाठी पोलीस पुढे सरसावत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.