हरिद्वार (उत्तराखंड) - योग गुरू रामदेव बाबा यांच्या पंतजली या संस्थेने कोरोनावर उपाय म्हणून 'कोरोनिल' औषधाची निर्मिती केली आहे. मात्र, केंद्रिय आयुष मंत्रालयाने यावर औषधीच्या प्रचार आणि प्रसारावर बंदी आणली आहे. यानंतर पतंजलीने केंद्रिय आयुष मंत्रालयाच्या सर्व शंका दूर करण्याचा दावा केला आहे.
पंतजलीने म्हटले आहे, कोरोनाच्या औषधीबाबत आयुष मंत्रालयामध्ये जो संवाद राहिला होता, तो पुर्ण झाला आहे. मंत्रालयाला सांगण्यात आले आहे की, पतंजलि ने रेंडमाइज्ड प्लेस्कबो कंट्रोल्ड क्लीनिकल ट्रायलचे सर्व स्टँडर्ड परिमाणांना 100 टक्के पूर्ण केले आहे. तसेच याबाबतची सर्व माहिती आयुष मंत्रालयाला पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, योग गुरू रामदेव बाबा यांनी मंगळवारी दुपारी 12 वाजता कोरोनावर आयुर्वेदिक औषधी शोधल्याचा दावा केला. तसेच या औषधीला लॉन्च केले. यासोबतच पतंजली रिसर्च इंस्टीट्यूटने या औषधीची 280 लोकांवर चाचणी करण्यात आली. जी 100 टक्के यशस्वी झाली आहे. या सर्व प्रकारानंतर आयुष मंत्रालयाने पतंजलीला कोरोनिल या औषधीशी संबंधित जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले होते.
हेही वाचा - पतंजलीचे कोरोनावरील औषध वादाच्या भोवऱ्यात; 'आयुष' मंत्रालयाने मागितले दाव्यांचे पुरावे..