ETV Bharat / bharat

पतंजली कोरोनिल औषध बाजारात विकू शकते, पण...

author img

By

Published : Jul 1, 2020, 7:06 PM IST

पतंजली हे औषध कोरोनावरील उपचार म्हणून विकू शकत नाही, तर फक्त प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी हे औषधाची बाजारात विक्री होईल, असे आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

बाबा रामदेव
बाबा रामदेव

नवी दिल्ली - पतंजलीने तयार केलेल्या कोरोनिल औषधावर आयुष मंत्रालयाची कोणतीही बंधने नसून औषध लवकरच बाजारात उपलब्ध होईल, असे आज(बुधवार) योगगुरू रामदेव बाबा यांनी हरिद्वारमध्ये पत्रकार परिषद घेत सांगितले. पतंजली या औषधाला कोरोना आजारावरील व्यवस्थापनासाठीचे औषध, असे म्हणत आहे. मात्र, यावरून हे औषध नक्की कशासाठी आहे, असा संभ्रम ग्राहकांमध्ये होऊ शकतो.

पतंजली कोरोनिल हे किट कोरोनावरील उपचाराचे औषध म्हणून विकू शकत नाही, तर फक्त प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी औषध म्हणून बाजारात विकले जाऊ शकते, असे आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

पतंजलीच्या कामाचे आयुष मंत्रालयाने कौतुक केल्याचेही रामदेव बाबा म्हणाले. कोरोनोवरील औषधाऐवजी कोरोना व्यवस्थापनावरील औषध, असे म्हणण्यास आयुष मंत्रालयाने सांगितल्याचे रामदेव बाबा पत्रकार परिषदेत म्हणाले.

कोरोनावर आयुर्वेदीक औषध शोधल्याचा दावा पतंजीलीने मागील आठवड्यात केला होता. त्यानंतर पतंजलीने या गोळ्यांची जाहिरातबाजाही सुरू केली होती. मात्र, आयुष मंत्रालायने या औषधाच्या जाहिरातींवर बंदी आणत औषधाचे सर्व अहवाल तपासासाठी घेतले होते. आयुष मंत्रालयाने पतंजलीचा दावा तपासून पाहिला आहे. कोरोनाच्या औषधाची चाचणी आयुष मंत्रालयातील टास्क फोर्सकडून करण्यात आली. त्यानंतर रामदेवबाबा यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

रामदेव बाबा पत्रकार परिषदेत म्हणाले, कोरोना संसर्गाच्या व्यवस्थापनासाठी पतंजलीने योग्य काम केले आहे, असे आम्हाला आयुष मंत्रालयाने म्हटले. पतंजलीचे काम योग्य दिशेने सुरू आहे. आम्ही या औषधांसाठी राज्य सरकारकडून परवानगी घेतली आहे. राज्य सरकारे आयुष मंत्रालयाशी जोडले गेले आहे. मात्र, लायसनमध्ये ट्रिटमेंट(उपचार) हा शब्द वापरण्यात आला नाही.

आयुष मंत्रालयाशी आमचे कोणतेही मदभेद नाहीत. आता कोरोनिल, श्वासारी, गिलोय, तुलसी, अश्वगंधा या औषधांवर कोणतेही निर्बंध नाहीत. आजपासून श्वासारी कोरोनिल किट कोणत्याही कायदेशीर बंधनाशिवाय देशभरात उपलब्ध होईल. आयुष मंत्रालय आणि मोदी सरकारचे धन्यवाद, असे रामदेव बाबा म्हणाले.

पतंजलीने या औषधासाठी अनेक चाचण्या केल्या आहेत. 3 दिवसांत 69 टक्के, तर 7 दिवसांत 100 टक्के कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. सर्व अहवाल आयुष मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. चार क्लिनिकल चाचण्यांचा अहवाल मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. आम्ही केलेले संशोधन सर्व नियमांनुसार आहे, असे रामदेव बाबा म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.