ETV Bharat / bharat

लॉकडाऊनमध्ये आई-वडिलांनी आपला वेळ मुलांबरोबर घालवावा... - लॉकडाऊन कुटुंबासोबत वेळ

शाळा बंद आहेत आणि मुले बाहेर जाऊ शकत नसल्याने, त्यांच्या मानसिक आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. मुलांना अस्वस्थ वाटत आहे, तणाव जाणवत असल्याने ते चिडखोर बनत आहेत. म्हणून, आईवडलांवर मुलांना अधिक प्रेमाने, काळजीने आणि संयमपूर्वक हाताळण्याची जास्त जबाबदारी येऊन पडते. पण शाळा बंद असल्याने आईवडलांना मुले आणि किशोरवयीनांबरोबर नातेसंबंध सुधारण्याची संधीही आहे.

Parents must spend quality time with children during lockdown
लॉकडाऊनमध्ये आई-वडिलांनी आपला वेळ मुलांबरोबर घालवावा...
author img

By

Published : Apr 2, 2020, 12:21 PM IST

घरात ३ आठवडे रहाणे ही कुणासाठीही आनंददायक स्थिती नाही. लहान मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांसाठी तर ते अधिकच अवघ़ड आहे कारण त्यांना शाळा, शिकवणी किंवा मित्रांबरोबर सतत बाहेर रहाण्याची सवय असते. शाळा बंद आहेत आणि मुले बाहेर जाऊ शकत नसल्याने, त्यांच्या मानसिक आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. मुलांना अस्वस्थ वाटत आहे, तणाव जाणवत असल्याने ते चिडखोर बनत आहेत. म्हणून, आईवडलांवर मुलांना अधिक प्रेमाने, काळजीने आणि संयमपूर्वक हाताळण्याची जास्त जबाबदारी येऊन पडते. पण शाळा बंद असल्याने आईवडलांना मुले आणि किशोरवयीनांबरोबर नातेसंबंध सुधारण्याची संधीही आहे. खूप वेळ हाताशी उपलब्ध असल्याने, आईवडील त्या वेळेचा उपयोग मुलांना अधिक प्रेम दिल्यासारखे आणि सुरक्षित वाटेल, यासाठी करू शकतात.

जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, पेरेंटिंग फॉर लाईफलॉंग हेल्थ, इंटरनेट ऑफ गुड थिंग्ज,सीडीसी अँड अक्सिलरेट यांनी पालकांसाठी काही सूचना केल्या आहेत. यामुळे या अवघड टप्प्यात मुलांना आपण घरात महत्वाचे आहोत आणि आईवडील आपल्यावर प्रेम करतात, असे वाटेल. या सूचनांच्या संचानुसार, पालकांना आपल्या प्रत्येक मुलाबरोबर घालवण्यासाठी वेळ काढून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. केवळ २० मिनिटे किंवा त्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागेल, ज्यात मुलाला त्याला किंवा तिला सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काय करायला आवडेल, असे विचारले पाहिजे. चिमुकल्यांसाठी, गाणी गाणे आणि थाळ्यावर चमचाने ताल धरून संगीत, ठोकळ्यातून विविध रचना तयार करणे किंवा अगदी एखादी कथा किंवा पुस्तक वाचणे हे चांगले ठरेल. किशोरवयीन मुलांना त्यांच्या आवडीचे खेळ, टीव्हीवरील कार्यक्रम किंवा मित्रांबरोबर बोलून त्यांचे मनोरंजन करता येईल. घराभोवती किंवा घरातच चालणे किंवा सगळ्यांनी मिळून व्यायाम करणे अत्यंत प्रशंसनीय ठरेल.

टीव्ही आणि मोबाईल बंद करून थोडा वेळ, एखादे पुस्तक वाचणे किंवा चित्रे पहाणे किंवा नृत्य करण्यासाठी त्या वेळाचा उपयोग करणे चांगली कल्पना ठरेल. स्वच्छता आणि स्वयंपाक अशा घरगुती कामांमध्ये मुलांना गुंतवून ठेवले तर सुरेख ठरेल. पण, मुलांना होमवर्कमध्ये आणि अभ्यासात मदत करणे अत्यंत महत्वाचे आहे.

मुलांशी वागताना पालकांसाठीही हे दिवस तितकेच अवघड आहेत. पालक नेहमी आपल्या मुलांना एखादी गोष्ट करू नका, असे सांगत असतात किंवा त्यांच्यावर ओरडत असतात. पालक आपल्या मुलांप्रति अधिक सकारात्मक झाले आणि उत्कृष्ट वर्तनाबद्दल त्यांचे कौतुक केले तर ते अधिक छान होईल. मुलांचे कौतुक करणे हे त्यांना प्रेरित करणारे होईलच पण त्यांची दखल घेतली जात आहे आणि काळजी केली जात आहे, याबद्दल त्याना विश्वास वाटू लागेल. मुलांना आज्ञा देण्यापेक्षा त्यांना विनंती करणे अधिक महत्वाचे आहे. मुलांवर ओरडल्याने ते केवळ तणावपूर्ण आणि संतप्त होतील. शांत आवाजात त्यांच्याशी बोला. किशोरवयीन मुलांनी मित्रांबरोबर संवाद साधण्यास सक्षम होण्याची गरज आहे. विशेषतः जेव्हा त्यांना वाटणारी भीती आणि काळजी याबद्दल ते बोलू इच्छित असतील तर त्यांना त्यांची मते व्यक्त करण्यासाठी वेळ आणि अवकाश द्या. या सूचनांमध्ये पालकांना मुलांसाठी रचनात्मक उपक्रम आणि मुक्त वेळ यासंदर्भात वेळापत्रक ठरवण्यासही सांगितले आहे.यामुळे मुलांना सुरक्षित आणि चांगले वर्तन असल्याचे वाटण्यास सहाय्य होईल. दररोज घरातच व्यायाम करण्याने मुलांना तणाव कमी होऊन मोठी उर्जा मिळेल.

आणखी एक मुलांसाठी सहाय्यकारी ठरणारा उपक्रम म्हणजे पत्रे लिहिणे आणि चित्रे काढणे आणि ते लोकांबरोबर सामायिक करणे-त्यांचे छायाचित्र घेऊन ते पाठवणे हा आहे. हात धुणे आणि स्वच्छता हे गमतशीर खेळ म्हणून करा ज्यामुळे मुलांना त्याची सवय लागेल. मुलांना हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायची गरज का आहे, याबद्दल सांगणेही महत्वाचे आहे. प्रत्येक दिवसाच्या अखेरीस, दिवसाबद्दल विचार करण्यासाठी एक मिनिट द्या. मुलांना त्यांनी दिवसभरात केलेली एक सकारात्मक गोष्ट किंवा गमतीची गोष्ट सांगा.

वाईट वर्तन ही काही असामान्य गोष्ट नव्हे. जेव्हा ते थकलेले असतात, भुकेले, घाबरलेले किंवा स्वतंत्रपणे शिकत असतात तेव्हा तर ते जास्तच होते. घरात असण्याने वाईट वर्तनात भरच पडते. उत्तम वेळ त्यांना देणे, चांगल्यासाठी त्यांचे कौतुक करणे आणि सातत्यपूर्ण नित्यक्रम यामुळे वाईट वर्तनात घट होईल.

पालकांनीही त्यांची स्वतःची काळजी घेऊन शांत राहून तणावाचे व्यवस्थापन केले पाहिजे. यासाठी, अगदी मोकळेपणे मुलांचे ऐकून घेतले पाहिजे ज्यामुळे ते तुमच्याकडे आधार आणि आश्वस्त होण्याच्या दृष्टिने पाहतील. मुले त्यांना काय वाटते हे जेव्हा सांगत असतील तेव्हा त्यांचे म्हणणे ऐका. सोशल मिडिया अशा वेळेस टाळा कारण त्यामुळे तुम्हाला घाबरल्यासारखे वाटू लागते. जेव्हा कुटुंब एकत्र गर्दी करत असते, तेव्हा आरामदायक किंवा तणावरहित वाटण्याचे इतर मार्ग शोधणे उत्कृष्ट ठरेल. मद्यसेवन केल्याने कुणीही ओरडू लागतो, एकमेकांना मारहाण करतात आणि संतप्त वाटू लागते.

घरात एक मिनिट अगदी शांतपणे रहाण्याच्या उपक्रमाने मन तणावरहित होते आणि तुमच्या विचारांचे आत्मपरिक्षण करता येते तसेच आपल्याला भावनिकदृष्ट्या काय वाटते आहे, हे माहित करून घेता येते.

प्रत्येक मुद्यावर बोलण्याची इच्छा असू द्या. मुलांनी अगोदरच काहीतरी ऐकलेले असते. शांतता आणि गोपनीयता मुलांचे संरक्षण करू शकत नाही पण प्रामाणिकपणा आणि खुलेपणाने ते होते. ते कितपत समजून घेऊ शकतील याचा विचार करा. प्रश्नांना नेहमीच खरी उत्तरे देणे आणि माहित नसतील तर तसे सांगणे सहाय्यकारी ठरते. काहीवेळा मुले तेच तेच प्रश्न अनेक वेळा विचारतात.अशा वेळी त्यांच्या प्रश्नांना शांत आणि सहाय्यक आवाजात उत्तरे आणि स्पष्टीकरणे दिल्याने त्यांना आश्वस्त वाटेल.

(लेखिका आरती धर या ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.