चंदीगढ - पंजाबमध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे 158 रुग्ण आढळून आले आहेत. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 1 मेपर्यंत संचारबंदी वाढवली आहे.
संचारबंदी लवकर हटवण्यासाठी राज्य सरकारने 15 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी रणनीती तयार करणार आहे. तसेच राज्य सरकारने 5 वी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलले आहे.
देशामध्ये आत्तापर्यंत 7 हजार 447 रुग्ण आढळून आले आहेत. तर 642 जण पूर्णत बरे झाले आहेत. मागील 24 तासात देशात 1 हजार 35 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 239 रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती आरोगय मंत्रालयाने दिली आहे.
कोरोनाच्या रुग्णांना हाताळण्यासाठी 586 रुग्णालये सज्ज असून 1 लाख आयसोलेशन बेड तयार ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती लव अगरवाल यांनी दिली आहे.