चंदीगढ - पंजाबच्या पटियाला जिल्ह्यामध्ये नाकबंदीवर असलेल्या पोलिसांवर आज पहाटे काही व्यक्तींना हल्ला केला. यामध्ये सहाय्यक उपनिरिक्षकाचा हात हल्लेखोरांनी तोडला, तर सहा कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली आहे. बाहेर फिरण्यास मज्जाव केल्याच्या रागातून या व्यक्तींनी पोलिसांवर हल्ला केला.
हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिले आहे. पटियाला जिल्ह्यातील निहंगा जमातीच्या चार ते पाच जणांच्या हल्ल्यात 7 पोलीस जखमी झाले आहेत. यामध्ये एका पोलिसाचा हातही तोडला आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, निहंगा जमातीचे चार ते पाच लोक लॉकडाऊन असतानाही प्रवास करत होते. पहाटे सहाच्या सुमारास मंडी बोर्ड पोलिसांनी त्यांना अडवून, बाहेर फिरत असल्याबाबत विचारणा केली. मात्र त्यांनी बॅरिकेट्सवर गाडी धडकवली, आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एका पोलिसाचा हात तोडला. पटियालाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनदीप सिंग सिंधू यांनी याबाबत माहिती दिली.
यामध्ये एका सहाय्यक उपनिरिक्षकाचा हात तलवारीच्या हल्ल्यात कापला गेला. तसेच पटियाला सदरचे स्टेशन हाऊस अधिकारी यांच्या हाताच्या कोपरावर जखम झाली. यासोबतच आणखी एका पोलीस अधिकाऱ्याच्या हाताला जखम झाल्याची माहिती सिंधूंनी दिली. यानंतर हल्लेखोर निहंग्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. आता हल्लेखोरोना ताब्यात घेण्यात आले आहे.