एर्नाकुलम - कोथामंगलम तालुक्याच्या सरपंच रशिदा सलीम ह्या समाजसेवेबरोबरच त्यांच्या घरातील छतावर केलेल्या भाजीपाला लागवडीने गावातच नव्हे तर संपूर्ण पंचायतीसाठी आदर्श ठरल्या आहेत. महिला असोसिएशन जिल्हा कार्यकारी समिती आणि सीपीएम एरिया कमिटीच्या सदस्या म्हणून रशिदाने आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली आणि त्यांची वाटचाल अद्याप सुरूच आहे.
पंचायतीचे काम आटोपून घरी आल्यावर त्या आपल्या किचन गार्डनकडे वळतात, त्यांनी त्यांच्या घराच्या छतावर लावलेले किचन गार्डन हे त्यांचे प्रयत्न आणि मेहनतीतून आज उभे राहिले आहे. रशिदा यांनी प्रथम पंचायत कार्यालयाच्या जागेवर शेतीचा प्रयोग केला, यातून त्यांना चांगले उत्पादन मिळाले. यातून त्यांनी घराच्या घराच्या छतावर शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वयंपाकघरातील बागेत ग्रोबॅग आणि प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये भाज्या लावल्या आणि त्या भाजीपाल्यांच्या संरक्षणासाठी हिरव्या जाळीचे आवरण टाकले. मात्र, त्यांचा या पहिल्या प्रयत्नाला यश आले नाही.
हेही वाचा - समान नागरी कायदा कधी लागू होणार? नक्की काय आहे कायदा..जाणून घ्या
त्यानंतर त्यांनी हार न मानता परत एकदा भाजीपाला लावला, आणि यावेळी पिकांची अधिक काळजी घेतली. शेवटी रशिदाच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांचा घरावरील छतावर भाजीपाला लागवडीचा उपक्रम यशस्वी ठरला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी रशीदांना तिच्या घरच्यांनीही पाठिंबा दिला. विशेषत: पती मोहम्मद सिनन जे केएसईबी येथे कार्यरत आहेत त्यांनी रशीदांना मोलाची मदत केली. पती-पत्नी व घरच्यांच्या पाठिंब्याने त्यांचे भाजीपाला लागवडीचे स्वप्न पूर्ण झाले असून त्यातून उत्पन्न देखील यायला लागले आहे.
हेही वाचा - पाकिस्तानकडून वर्षभरात २०५० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताने व्यक्त केली चिंता
आता, त्या हिरव्या तंबूत आपल्या घरासाठी सर्व प्रकारच्या भाज्यांची लागवड करत आहेत. रशिदा सांगतात की, प्रत्येकाने स्वतःसाठी आपल्या घरच्यांसाठी भाजीपाल्याची लागवड करावी. हा एक चांगला उपक्रम असून यातून बिनखताच्या भाज्यांची लागवड करून बिनखतांचा पौष्टिक आहार घेऊ शकतो. मात्र, जागेची कमतरता, कामाच्या व्यस्तता किंवा अशा काही कारणांमुळे आपण या गोष्टी करण्यास टाळाटाळ करत असतो. पण हा उपक्रम अतिशय चांगला प्रत्येकाने आपापल्या परिने हा उपक्रम करायला हवा.
हेही वाचा - 'तुमच्या देशातील अल्पसंख्याकांच्या छळाविषयी बोला'; भाजप खासदाराची मलालावर आगपाखड