तिरुवनंतपुरम- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशासह संपूर्ण जग लॉकडाऊन झाले आहे. यामुळे केरळमध्ये सर्वत्र पाम रविवार घराममध्येच साजरा करण्यात येणार आहे. पाम रविवारपासून आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
केरळमध्ये पाम रविवारच्या दिवशी कार्यक्रमांचे आयोजनामुळे चर्चमध्ये गर्दी पाहायला मिळते. यानंतर सोमवार, गुरुवार आणि गुड फ्रायडेच्या दिवसी चर्चमध्ये गर्दीने भरुन गेलेली असतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे हे चित्र दिसत नाही. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने ख्रिश्चन बांधवाना घरामध्येच प्रार्थना करावी लागणारआहे.
पाम रविवार साजरा करण्यासाठी केरळ राज्याच्या प्रशासनाने सूचना जारी केल्या आहेत. पाम रविवारमध्ये पाच जणांपेक्षा जास्त जणांनी सहभागी होऊ नये, असे सांगण्यात आले आहे. पाम रविवारच्या निमित्ताने करण्यात येणारे मार्गदर्शन ऑनलाईन घेता येणार आहे.
येशू ख्रिस्त जेरुसलेममध्ये पोहोचल्याच्या दिवसाचे स्मरण म्हणून पाम रविवार साजरा केला जातो. केरळमध्ये ख्रिश्चन लोकसंख्या 61.41 लाख इतकी आहे.