ETV Bharat / bharat

महानगरपालिकेवर झळकवलं छत्रपत्री शिवराय अन् जय श्री राम लिहलेलं ब‌ॅनर; भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - पलक्कड महानगरपालिका न्यूज

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेला आणि जय श्रीराम असा मजकूर लिहिलेला भव्य असा बॅनर झळकवला. याप्रकरणी केरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पलक्कड महानगरपालिका न्यूज
पलक्कड महानगरपालिका न्यूज
author img

By

Published : Dec 18, 2020, 6:14 PM IST

कोची - केरळच्या पलक्कड पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर सांप्रदायिक द्वेष पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विजय मिळवल्यानंतर पलक्कड महानगरपालिकेमध्ये सांप्रदायिक नारेबाजी केली. तसेच पालिकेच्या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेला आणि जय श्रीराम असा मजकूर लिहिलेला भव्य असा बॅनर झळकवला. याप्रकरणी केरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

महानगरपालिकेवर झळकवलं छत्रपत्री शिवराय अन् जय श्री राम लिहलेलं ब‌ॅनर; भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सांप्रदायिक द्वेष पसरवल्याप्रकरणी आणि धार्मिक विभाजन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम 153 अंतर्गत केरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) आणि काँग्रेसनेही याबाबत तक्रार केली होती. केरळच्या पलक्कडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपाने विजय मिळवल्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते आणि अधिकारी पालिका भवनामध्ये पोहचले. यावेळी सांप्रदायिक नारेबाजी केली. तसेच पालिकेच्या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेला आणि जय श्रीराम असा मजकूर लिहिलेला भव्य असा बॅनर झळकवला. भाजपा नेता सी कृष्णकुमार आणि भाजपाचे राज्य महासचिव शिवराजन यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी ही नारेबाजी केली.

पुढील वर्षी केरळमध्ये विधानसभा निवडणुका -

केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपानेही सर्व शक्ती पणाला लावली होती. काही ग्रामपंचायतींवर भाजपाने विजय मिळवला आहे. तर एक महानगरपालिकाही जिंकली आहे. पुढील वर्षी केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना महत्त्व प्राप्त झाले आहे. मागील वर्षी काँग्रेस पक्षाला लोकसभेच्या जागेवर केरळमध्ये मोठा विजय मिळाला होता. मात्र, आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पिछाडीवर पडल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा - कोरोना रुग्णालयांचे फायर ऑडिट करा; सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.