नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्प दंशाची धमकी देणारी पाकिस्तानी गायिका रबी पीरजादा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. नुकतचं या तरुणीविरुध्द पंजाब सरकारने प्राण्यांना पाळीव बनवून घरात ठेवण्याच्या आरोपाखील वारंट जारी केले आहे.
-
ایک کشمیری لڑکی کی تیاری مودی کے خلاف، ویسے تو اس نے جہنم میں جانا ہی ہے، مگر اس جیسے انسا ن کی دنیا بھی جہنم ہونی چاہیے۔ #chotisibaathttps://t.co/cGfxSd0hd5 pic.twitter.com/h3C9HA1BT0
— Rabi Pirzada (@Rabipirzada) September 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">ایک کشمیری لڑکی کی تیاری مودی کے خلاف، ویسے تو اس نے جہنم میں جانا ہی ہے، مگر اس جیسے انسا ن کی دنیا بھی جہنم ہونی چاہیے۔ #chotisibaathttps://t.co/cGfxSd0hd5 pic.twitter.com/h3C9HA1BT0
— Rabi Pirzada (@Rabipirzada) September 2, 2019ایک کشمیری لڑکی کی تیاری مودی کے خلاف، ویسے تو اس نے جہنم میں جانا ہی ہے، مگر اس جیسے انسا ن کی دنیا بھی جہنم ہونی چاہیے۔ #chotisibaathttps://t.co/cGfxSd0hd5 pic.twitter.com/h3C9HA1BT0
— Rabi Pirzada (@Rabipirzada) September 2, 2019
पंजाब वन्यजीव संरक्षण व फलोत्पादन विभागाने रबी पीरजादाविरुध्द चार अजगर, एक मगर आणि सापांसह इतर वन्य प्राण्यांना घरात ठेवल्यामुळे कारवाई केली आहे. याप्रकरणाची सुनावणी शुक्रवारी मॉडल टाऊन न्यायालयात करण्यात आली. दरम्यान दंडाधिकारी हरीस सिद्दीकी यांनी सुनावणी 11 ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर टाकली. वन्यजीव संरक्षण विभागाने केलेल्या कारवाईमुळे आता पीरजादाच्या अडचणी वाढल्या आहेत.
काय प्रकरण?
रबी पीरजादा पाकिस्तानी गायिका आहे. नुकतचं पिरजादाने सोशल मीडियावर स्वत: ला काश्मिरी मुलगी असल्याचे वर्णन करत एक व्हिडिओ शेअर केला होता. "भारत तुझ्यासाठी ही काश्मीरी मुलगी आपल्या सापांसह पुर्णपणे तयार आहे. या सर्व भेटवस्तू मोदींसाठी आहेत. मोदी, तुम्ही काश्मिरींना त्रास देत आहात, म्हणून नरकात मरण्यासाठी तयार व्हा ", असे तिने व्हिडिओमध्ये म्हटले होते.