राजौरी - पाकिस्तानी सैन्याने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी भागामध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. काल (बुधवारी) संध्याकाळी १० च्या सुमारास गोळीबाराला सुरुवात झाली. यावेळी लहान आणि मोठ्या तोफांचा मारा पाकिस्तानी सैन्याने केला. सुरक्षा चौक्या आणि सीमेवरील गावांना पाकिस्तान लष्कराने लक्ष केले.
या आगळीकीला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. याआधी मंगळवारी पाकिस्तानने सुंदरबनी भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. ३ ऑगस्ट रोजी मेंढर क्षेत्रामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लघंन केले होते. मागील महिन्यात पाकिस्तानने पुंछ आणि राजौरी जिल्ह्यात केलेल्या गोळीबारात २ जवान हुतात्मा झाले होते, तर १० वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला होता.
जम्मू काश्मीरचे विभाजन केल्यानंतर सुरक्षा दलांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. काल(बुधवार) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.