ETV Bharat / bharat

पाकिस्तान काश्मीरमध्ये हिंसाचार पसरवतोय - अजित डोवल - अजित डोवाल

मोठ्या प्रमाणात काश्मीरींचा आर्टिकल ३७० हटवण्याला पाठिंबा आहे, असे डोवाल म्हणाले.

अजित डोवल
author img

By

Published : Sep 7, 2019, 6:36 PM IST

श्रीनगर - भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेतला. काश्मीर खोऱ्यातील ९२. ५ टक्के भूभागावर कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने काश्मीरातील परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहेत, असे डोवाल म्हणाले. तसेच मोठ्या प्रमाणात काश्मीरींचा आर्टिकल ३७० हटवण्याला पाठिंबा आहे, असे ते म्हणाले.

सीमेपलीकडील २० किमी अतंरावरून पाकिस्तानी काश्मीरातील दहशतवाद्यांशी आणि फुटीरतावाद्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातील काही संदेश आमच्या हाती आले आहेत. सांकेतिक भाषेमध्ये दहशतवाद्यांना शस्त्रे आणि दारुगोळा पुरवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे.

काश्मीरातील कोणत्याही नेत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल नाही. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून नेत्यांना अटक करण्यात आली आहे. जमावाचा दहशतवादी फायदा घेऊ शकतात म्हणून निर्बंध लादण्यात आले आहेत, असे डोवाल म्हणाले. लवकरच परिस्थिती सुधारेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

  • National Security Advisor Ajit Doval: I am totally convinced that majority of Kashmiris support the abrogation of article 370 , they see greater opportunities,future, economic progress and employment opportunities ,only a few miscreants are opposing it pic.twitter.com/D11a9yBVHN

    — ANI (@ANI) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाकिस्तान काश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्याचा जाणून बुजून प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. आत्तापर्यंत २३० पाकिस्तानी दहशतवादी काश्मीरमध्ये आले आहेत. त्यातील काहींना अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तान प्रथम काश्मीरमध्ये हिंसाचार घडवून आणत आहे आणि त्यानंतर जगामध्ये काश्मीरमध्ये हिंसाचार घडत असल्याचा कांगावा करत आहे, असे डोवाल म्हणाले.

काश्मीरातील सर्व व्यवहार आणि बाजार ठप्प रहावे म्हणून पाकिस्तान दहशतवाद्यांशी संपर्क करत आहे. एक व्यापारी दुकान उघडत असताना दहशतवाद्यांनी त्याला ठार मारले. तसेच काश्मीरमधून सुरू असलेला संफरचंदाचा व्यापार बंद पाडण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. दररोज ७५० सफरचंदाचे ट्रक श्रीनगरमधून बाहेर जात आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांनी एका आघाडीच्या व्यापाऱ्याच्या घरावर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले.

काश्मीर खोऱ्यातील ११९ पोलीस ठाण्यांपैकी फक्त १० ठाण्यांच्या क्षेत्रामध्ये निर्बंध आहेत, बाकीच्या भागामध्ये कोणतेही निर्बंध नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Intro:Body:

nat

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.