नवी दिल्ली - भारत सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यामुळे पाकिस्तान भारताला युद्धाची धमकी देत होता. पोकळ धमक्यानंतर 'पाकिस्तान भारताबरोबर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं' पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा - मोदींचे नाव घेताच पाक मंत्र्याला बसला '३७०'चा झटका!
पाकिस्तान भारताबरोबर द्विपक्षीय चर्चा करण्यात आम्हाला काहीही अडचण नाही. मात्र भारताकडून चर्चेसाठी कोणतीच सकारात्मक हालचाल पाहण्यास मिळाली नाही. काश्मीर प्रकरणी भारत-पाकिस्तान-काश्मीर तीन पक्ष आहेत. या चर्चेसाठी काश्मीरमधील नजरबंद असलेल्या नेत्यांची सुटका होणे गरजेचे असल्याचे कुरेशी म्हणाले आहेत. तर काश्मीरमधील नेतृत्वाला भेटण्याची मागणी कुरेशींनी केली आहे.
हे ही वाचा - झिरो पॉईंटवर पार पडणार भारत-पाक दरम्यान कर्तारपूर कॉरिडॉर बैठक
यापुर्वी काश्मीरमधील कलम 370 रद्द करून मोदींनी ऐतिहासिक चूक केली आहे. काश्मीर प्रकरणी आपण कोणत्याही थराला जाऊ' अशी इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली होती.