ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'हा' प्रस्ताव पाकिस्तानला मान्य, 15 मार्चला करणार चर्चा

कोरोना विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यावर पाकिस्ताचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोना विषाणूविरोधात सार्क देशांसोबत काम करण्यास सहमती दर्शवली आहे.

PAKISTAN ACCEPTED PM MODIS JOINT SAARC STRATEGY PROPOSAL TO FIGHT AGAINST CORONA VIRUS

author img

By

Published : Mar 14, 2020, 9:40 PM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यावर पाकिस्ताचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोना विषाणूविरोधात सार्क देशांसोबत काम करण्यास सहमती दर्शवली आहे.

15 मार्चला म्हणजे उद्या सायंकाळी 05 वाजता सार्क देश व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. जागतीक स्तरावर कोरोना विषाणूवर ठोस उपाययोजना आणि मजबूत धोरण आखण्यासाठी सार्क देश चर्चा करतील. याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी दिली.

कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी जागतिक स्तरावर एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. कोरोना विषाणूवर व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून होणाऱ्या चर्चेत पाकिस्तानही भाग घेईल, असे टि्वट पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या आयशा फारूकी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी जागतिक स्तरावर पुढाकार घेतल्याबद्दल मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोली, श्रीलंका राष्ट्राध्यक्ष गोताबाय राजपक्षे आणि नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी मोदींच्या कल्पनेचे स्वागत केले. कोरोना विषाणूविरोधात सार्क देशांसोबत काम करण्यासाठी आमचे सरकार तयार असल्याचे या देशांच्या नेतृत्वाने म्हटले.

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन कोरोनो विषाणूविरोधात व्यापक उपाययोजना करण्यासाठी सार्क देशांच्या प्रतिनिधींना आमंत्रण दिले होते. 'सार्क देशांच्या नेतृत्वाने कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी एक ठोस उपायोजना करायला हवी. देशातील नागरिकांच्या आरोग्यासंबधी आपण व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून चर्चा करू शकतो आणि कोरोना विषाणूचा होणार प्रसार थांबवू शकतो', असे टि्वट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.

जगभरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे सर्वजण आरोग्याच्या सुरक्षिततेवर भर देत आहेत. वैयक्तीक स्वच्छतेबरोबरच एकमेकांशी संपर्क टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशा वेळी हस्तांदोलन न करता हाताने नमस्कार करण्याची पद्धत परदेशातही रुढ होताना पाहायला मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.