जम्मू (ज. का.) - पाकिस्तानकडून पूँछ जिल्ह्यातील लाइन ऑफ कंट्रोलवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याला भारतीय सेनेकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात असल्याची माहिती भारतीय सैन्याच्या प्रवक्त्याकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील किरणी भागात दुपारी 1.45च्या सुमारास पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. त्यानंतर भारतीय सेनेने या गोळीबारीस सडेतोड उत्तर दिले. हा गोळीबार काही वेळपर्यंतच टिकला. यात भारतीय सेनेला कुठलेही नुकसान झाले नसल्याची माहिती भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने दिली आहे.