ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन - Indian Army pak ceasefire

पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्युत्तर दिले. तसेच या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती लष्कराने दिली.

भारतीय लष्कर
भारतीय लष्कर
author img

By

Published : Jun 18, 2020, 5:07 PM IST

श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत कुपवाडा जिल्ह्यातील मच्चील सेक्टरमध्ये गोळीबार केला. दुपारी पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय चौक्यांवर मशीनगन आणि तोफगोळ्यांनी मारा केल्याच्या वृत्ताला लष्करी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्युत्तर दिले. तसेच या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती लष्कराने दिली. रविवारी (14 जून) पाकिस्तानी सैन्याने पुंछ जिल्ह्यामध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यावेळी एक जवान शहीद तर दोनजण जखमी झाले होते.

अनंतनाग जिल्ह्यात एका दहशतवाद्याला अटक

सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत अनंतगान जिल्ह्यातील जनगलत मंडी परिसरातून एका दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले आहे. नबी दार असे या दहशतवाद्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक पिस्तुलही ताब्यात घेण्यात आला आहे. काल(गुरुवार) रात्री ही कारवाई करण्यात आली, लष्करातील चिनार कॉर्प दलाने ही माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.