श्रीनगर - पाकिस्तानी लष्कराने आज(शुक्रवारी) काश्मीरातील पुंछ जिल्ह्यातील भारतीय लष्करी चौक्यांवर गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. लहान शस्त्रे आणि मोर्टार तोफांचा वापर पाकिस्तानी लष्कराने गोळीबार करण्यासाठी केला. सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल आनंद यांनी सांगितले की, आज सकाळी साडेआठ वाजता पाकिस्तानने पुंछ जिल्ह्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवरील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्त्युत्तर दिले.
काल (गुरुवारी) पाकिस्तानी सैन्याने पुंछ जिल्ह्यातही दिवसभर गोळीबार केला होता. यावर्षी आत्तापर्यंत पाकिस्तानने २ हजार ७३९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन असून यामध्ये सीमेवर राहणाऱ्या २४ नागरिकांचा मृत्यू झाला तर १०० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत.
सततच्या शस्त्रसंधीने सीमेवर राहणाऱ्या नागरिकांचे जीवन कठीण बनले आहे. अनेक वेळा गोळीबारात घरांचे नुकसान होते. तर पाळीव प्राणीही ठार होतात. त्यामुळे गोळीबाराची भीती गावकऱ्यांच्या सतत डोक्यावर असते. भारत आणि पाकिस्तानमध्ये १९९९ साली शस्त्रसंधी करार झाला आहे. मात्र, त्याचे पाकिस्तानकडून सतत उल्लंघन करण्यात येत असून काश्मीरातील दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिला जात आहे.