ETV Bharat / bharat

पाककडून दोन हजारांपेक्षा जास्त सैनिक सीमारेषेवर तैनात, भारताचे बारकाईने लक्ष - पाकिस्तानी लष्कर

पाकिस्तानी लष्कराने सीमेवर २ हजारांपेक्षा जास्त सैनिकांना तैनात केले आहे. ही संख्या लष्कराच्या एका ब्रिगेड एवढी असल्याची माहिती मिळत आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Sep 5, 2019, 3:11 PM IST

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरची स्वायतत्ता काढून घेतल्यानंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाया वाढवल्या आहेत. पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी गट भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच पाकिस्तानी लष्कराने सीमेवर २ हजारांपेक्षा जास्त सैनिकांना तैनात केले आहे. ही संख्या लष्कराच्या एका ब्रिगेड एवढी असल्याची माहिती मिळत आहे.

भारत पाकिस्तान दरम्यान नियंत्रण रेषेच्या पलिकडे ३० किमी अंतरापर्यंत हे सैनिक आले आहे. नियंत्रण रेषेजवळील वाघा आणि कोटली क्षेत्रामध्ये पाकिस्तानी सैन्याने तळ ठोकला आहे. मात्र, भारतीय लष्कर पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने लक्ष ठेऊन आहे. पाकिस्तानी लष्कराने आधीपासूनच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे. लष्कर- ए -तोयबा आणि जैश -ए -मोहम्मदच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर भारतामध्ये घुसखोरी करण्यास मदत करत आहे.

हेही वाचा - पाकिस्तानला 1971 पेक्षाही अधिक जबरदस्त धडा शिकवू - लेफ्टनंट जनरल धिल्लाँ

पाकव्याप्त काश्मारात पाकिस्तानने सैन्य वाढवल्याने भारतीय सुरक्षा दले त्यांचा कोणताही कट उधळून लावण्यास सज्ज आहे. गुजरात किनाऱ्याजवळ सर क्रिक खाडीपाशीही पाकिस्तानने त्यांच्या लष्कराचे विशेष पथक तैनात केले आहे. अफगाण दहशतावद्यांना पाकिस्तानी लष्कर प्रशिक्षण देत असल्याची माहिती पुढे आली आहे.

३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात कारवाया वाढवल्या आहेत. पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. तसेच लष्कराच्या गोळीबाराच्या मागून दहशतवादी काश्मीरात पाठवण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा - पाककडून पुन्हा आगळीक.. दोन दिवसात तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन, उरीत गोळीबार

Intro:Body:

पाकने दोन हजारांपेक्षा जास्त सैनिक सीमारेषेवर केले तैनात, भारताचे बारकाईने लक्ष  
नवी दिल्ली - जम्मू काश्मीरची स्वायतत्ता काढून घेतल्यानंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाया वाढवल्या आहेत. पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी गट भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच पाकिस्तानी लष्कराने सीमेवर २ हजारांपेक्षा जास्त सैनिकांना तैनात केले आहे. ही संख्या लष्कराच्या एका ब्रिगेड एवढी असल्याची माहिती मिळत आहे.

भारत पाकिस्तान दरमम्यान नियंत्रण रेषेच्या पलिकडे ३० किमी अंतरापर्यंत हे सैनिक आले आहे.  नियंत्रण रेषेजवळील वाघा आणि कोटली क्षेत्रामध्ये पाकिस्तानी सैन्याने तळ ठोकला आहे. मात्र, भारतीय लष्कर पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने लक्ष ठेऊन आहे. पाकिस्तानी लष्कराने आधीपासूनच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे. लष्कर- ए -तोयबा आणि जैश -ए -मोहम्मदच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर भारतामध्ये घुसखोरी करण्यास मदत करत आहे.

पाक व्याप्त काश्मारात पाकिस्तानने सैन्य वाढवल्याने भारतीय सुरक्षा दले त्यांचा कोणताही कट उधळून लावण्यास सज्ज आहे. गुजरात किनाऱ्याजवळ सर क्रिक खाडीपाशीही पाकिस्तानने त्यांच्या लष्कराचे विशेष पथक तैनात केले आहे.

अफगाण दहशतावद्यांना पाकिस्तानी लष्कर प्रशिक्षण देत असल्याची माहिती पुढे आली आहे.
३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात कारवाया वाढवल्या आहेत. पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. तसेच लष्कराच्या गोळीबाराच्या मागून दहशतवादी काश्मीरात पाठवण्याचा प्रयत्न करत आहे.

nat

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.