अलवर- राजस्थानच्या अलवर जिल्हा न्यायालयाने पहलू खान मॉब लिंचिंग प्रकरणावर निर्णय दिला आहे. न्यायालयाने नऊ पैकी सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. केवळ संशय असल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे संशयाचा फायदा देत आरोपींची सुटका करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयाचे अवलोकन केल्यानंतर उच्च न्यायालयात अपील करण्यात येईल, अशी माहिती वकील योगेंद्र सिंह यांनी दिली.
आरोपी पक्षाचे वकील हुकमचंद शर्मा यांनी न्यायालयाच्या निर्णयाला ऐतिहासिक म्हटले आहे. पूर्ण देश या निर्णयाचे स्वागत करील. जे लोक हिंदू-मुस्लीम मुद्यावरुन राजनीती करतात, त्यांच्यासाठी ही जोरदार चपराक आहे. पोलिसांनी चुकीच्या तथ्यांवरुन आरोप लावले होते, असे हुकमचंद यांनी म्हटले आहे.
प्रकरण काय
हरियाणाच्या मेवातचे काही लोक 2017 मध्ये अलवर शहरातून गायींना गाडीमध्ये घेऊन जात होते. यावेळी काही लोकांनी अडवून त्यांच्याकडे चौकशी केली. योग्य उत्तर न मिळाल्याने मॉब लिंचिंग झाली होती. यात पेहलू खान यांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात 5 एफआयआर दाखल करण्यात आले होते.