नवी दिल्ली - आयएनएक्स माध्यम व्यवहारप्रकरणी सीबीआयने माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांना आज (मंगळवार) मध्यरात्री नोटीस पाठवली आहे. २ तासामध्ये चौकशीसाठी हजर व्हा, अशी नोटीस चिदंबरम यांच्या निवासस्थानावर लावण्यात आली आहे. याविरोधात चिदंबरम यांच्या वकिलांनी सीबीआयला कारवाई न करण्याबाबत विनंती केली आहे. मात्र, सीबीआयचे पथक सकाळी चिदंबरम यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी आले होते.
-
Delhi: A Central Bureau of Investigation (CBI) team arrives at the residence of P Chidambaram. Yesterday, Delhi High Court had dismissed his both anticipatory bail pleas in connection with INX Media case. pic.twitter.com/t2kvpNfxCC
— ANI (@ANI) August 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi: A Central Bureau of Investigation (CBI) team arrives at the residence of P Chidambaram. Yesterday, Delhi High Court had dismissed his both anticipatory bail pleas in connection with INX Media case. pic.twitter.com/t2kvpNfxCC
— ANI (@ANI) August 21, 2019Delhi: A Central Bureau of Investigation (CBI) team arrives at the residence of P Chidambaram. Yesterday, Delhi High Court had dismissed his both anticipatory bail pleas in connection with INX Media case. pic.twitter.com/t2kvpNfxCC
— ANI (@ANI) August 21, 2019
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नका, अशी विनंती चिदंबरम यांचे वकिल अर्शदीप सिंह खुराणा यांनी सीबीआयला केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात जामीन नाकारला गेल्यानंतर पी. चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज (मंगळवारी) सकाळी १०. ३० वाजता सर्वोच्च न्यायलयात त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
सीबीआयचे पोलीस अधिक्षक आर. पार्थसारथी यांना चिदंबरम यांचे वकिल खुराणा यांनी इमेलद्वारे माहिती दिली. मध्यरात्री माझ्या अशिलाच्या घराबाहेर नोटीस लावण्यात आली. खूप कमी वेळामध्ये चौकशीला हजर राहण्याचा आदेश कायद्यातील तरतुदींना धरुन नाही, असे चिदंबरम यांच्या वकिलांनी सीबीआयला सांगितले आहे.
-
Arshdeep Singh Khurana, P Chidambaram's lawyer, writes to CBI after CBI had put up a notice outside Chidambaram's residence: I am instructed to state that your notice fails to mention the provision of law under which my client has been issued a notice to appear within 2 hours. pic.twitter.com/xjUsGDGH6K
— ANI (@ANI) August 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Arshdeep Singh Khurana, P Chidambaram's lawyer, writes to CBI after CBI had put up a notice outside Chidambaram's residence: I am instructed to state that your notice fails to mention the provision of law under which my client has been issued a notice to appear within 2 hours. pic.twitter.com/xjUsGDGH6K
— ANI (@ANI) August 20, 2019Arshdeep Singh Khurana, P Chidambaram's lawyer, writes to CBI after CBI had put up a notice outside Chidambaram's residence: I am instructed to state that your notice fails to mention the provision of law under which my client has been issued a notice to appear within 2 hours. pic.twitter.com/xjUsGDGH6K
— ANI (@ANI) August 20, 2019
काय आहे आयएनएक्स माध्यम व्यवहार प्रकरण?
आयएनएक्स माध्यम व्यवहार पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना २००७ मध्ये झाला होता. यामध्ये आयएनएक्स या माध्यम समूहाला ३०५ कोटींची परदेशी गुंतवणूक मिळवून देण्यासाठी 'इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड' तर्फे मंजुरी देण्यात आली होती. ही मंजुरी देताना गैरव्यवहार केल्याचा ठपका चिदंबरम यांच्यावर आहे. १५ मे २०१७ ला सीबीआयने याप्रकरणी खटला दाखल केला आहे. तर २०१८ मध्ये सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रीगचा खटला दाखल केला आहे.