ETV Bharat / bharat

सुरक्षा मंजुरीमुळे देशातील ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीची चाचणी लांबणीवर - ऑक्सफोर्ड कोरोना लस चाचणी

डेटा सेफ्टी अँड मॉनिटरिंग बोर्ड (डीएसएमबी) विभागाच्या सुरक्षा मंजूरीनंतर, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही चाचणी सुरू करण्यात येणार होती. मात्र, पहिल्या १०० स्वयंसेवकांच्या सुरक्षेबाबत डीएसएमबीकडून अद्यापही मंजूरी न मिळाल्याने ही चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआयएमईआर) याठिकाणी ही चाचणी होणार होती.

Oxford COVID vaccine trials delayed over safety approvals
सुरक्षा मंजूरीमुळे ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीची चाचणी लांबणीवर
author img

By

Published : Sep 7, 2020, 6:39 AM IST

Updated : Sep 7, 2020, 7:48 AM IST

नवी दिल्ली : ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोनावरील लसीची क्लिनिकल चाचणी या आठवड्यात सुरू होणार होती. पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआयएमईआर) याठिकाणी ही चाचणी होणार होती. मात्र, सुरक्षा मंजुरीमुळे ही चाचणी आता एक आठवडा पुढे ढकलण्यात आली आहे.

डेटा सेफ्टी अँड मॉनिटरिंग बोर्ड (डीएसएमबी) विभागाच्या सुरक्षा मंजुरीनंतर, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही चाचणी सुरू करण्यात येणार होती. मात्र, पहिल्या १०० स्वयंसेवकांच्या सुरक्षेबाबत डीएसएमबीकडून अद्यापही मंजूरी न मिळाल्याने ही चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे पुढील स्वयंसेवकांची निवडही थांबवण्यात आली आहे. पीजीआयएमईआरमध्ये या चाचण्यांचे मुख्य अन्वेषक डॉ. मधू गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली.

ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‌ॅस्ट्राझेनेका यांच्या संयुक्त विद्यमाने तयार होत असलेल्या या लसीच्या चाचणीसाठी देशात १७ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यांपैकी एक असलेल्या पीजीआयएमईआर मध्ये २५३ स्वयंसेवकांवर ही चाचणी घेण्यात येणार आहे. या संस्थेमध्ये लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पार पडणार आहे.

या लसीचे उत्पादन आणि वितरण ही सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) करणार आहे. या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी वर्षाअखेरीपर्यंत ही लस तयार होईल, असा दावा केला आहे.

Last Updated : Sep 7, 2020, 7:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.