अबुधाबी - कोरोना लॉकडाऊमुळे संयुक्त अरब अमिरातमध्ये(युएई) अडकून पडलेल्या ३२ हजार भारतीय नागरिकांनी माघारी येण्यासाठी नोंदणी केली आहे. युएईमधील भारतीय दुतावासाने ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शुक्रवारी दुतावासाने ही आकडेवारी जाहीर केली.
गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संकेतस्थळावर ३२ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी नोंदणी केली आहे. अबुधाबातील कौन्सिल जनरल ऑफ इंडिया विपूल यांनी स्थानिक माध्यमांना ही माहिती दिली आहे. भारतीय दुतावास आणि कौन्सिल जनरल ऑफ इंडिया कार्यालयाने अडकून पडलेल्या नागरिकांना माघारी आणण्यासाठी नोंदणी सुरु केली आहे.
नोंदणी सुरू करण्यात आल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणात संकेस्थळावर आले. त्यामुळे वेबसाईटला तांत्रिक अडचण आली. त्यामुळे दुतावासाने नोंदणी करण्याबाबतचे ट्विट काढून टाकले, आणि गुरुवारी पुन्हा जाहीर केले. फक्त नोंदणी केल्यामुळे सीट आरक्षित झाले, असा अर्थ होत नाही, ज्यांना अत्यावश्यक आहे, त्यांनाच सुरुवातीला जाता येईल, असे कौन्सिल जनरलने सांगितले.