ETV Bharat / bharat

जेएनयू आंदोलनात इतर महाविद्यालयातील विद्यार्थीही सहभागी

जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठासह अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

जेएनयू आंदोलन
जेएनयू आंदोलन
author img

By

Published : Jan 8, 2020, 12:44 PM IST

नवी दिल्ली- जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठासह अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह आता डॉक्टरही आंदोलनात सहभागी झाले आहेत.

जेएनयू आंदोलन
दिल्लीतील डॉक्टर कफील यांनी जेएनयू विद्यार्थ्यांसोबत एक मोर्चा काढला. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात आधीच जेएनयू आणि जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलन करत होते. मात्र, आता जेएनयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचारावरूनही विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांनी दिल्ली पोलिसांविरोधातही घोषणाबाजी केली. आयेषा घोष विरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला, हा कसला न्याय आहे? असा प्रश्न सरकारला विचारत जोरदार घोषणाबाजी केली. अपयश येत असल्यामुळे काही गटांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. याशिवाय ते दुसरे काही करू शकत नाही, असे डॉ. कफील खान म्हणाले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.