नवी दिल्ली- काश्मीरविषयी मध्यस्थी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला विचारणा केली होती, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यसभेत गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यसभा 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली असून विकोधकांनी ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर नरेंद्री मोदींनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी लावून धरली आहे.
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्यावरुन सुरु झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्न आहे. शिमला करार आणि लाहोरची घोषणा ही दोन्ही देशांमधील प्रश्व सोडवण्याची महत्वाचे आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींनी अशा प्रकारची कोणतीही विचारणा ट्रम्प यांना केली नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, विरोधकांनी मोदींनीच यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे.