ETV Bharat / bharat

नीरव मोदीच्या अटकेचे श्रेय घेण्याची सरकारची लायकी नाही - ममता बॅनर्जी

नीरव मोदीला अटक झाल्यानंतर भारतीय राजकारणात त्याचे पडसाद उमटले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ते भाजप विरोधी सर्वच पक्षांनी या अटकेचे श्रेय सरकारने घेऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे.

ममता बॅनर्जी (संग्रहित छायाचित्र)
author img

By

Published : Mar 21, 2019, 9:46 AM IST

Updated : Mar 21, 2019, 10:58 AM IST

कोलकाता - पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) कर्ज बुडवणाऱ्या नीरव मोदीला लंडन येथे अटक झली आहे. त्याच्या अटकेनंतर मात्र देशात राजकीय वातावरण तापले आहे. मोदीला पकडण्याचे श्रेय घेण्याची केंद्रातील भाजप सरकारची लायकी नाही, चक्क असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तर, भाजप विरोधी अनेक नेत्यांनीही हाच सूर लावला आहे.

पीएनबीला १३ हजार ५०० कोटी रुपयांचा चुना लाऊन पसार झालेल्या नीरव मोदीला बुधवारी लंडनच्या होलबोर्न येथे अटक करण्यात आली. याच्या दोन दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने लंडन सरकारला त्याचे प्रत्यर्पण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर लंडनच्या वेस्टमिंस्टर न्यायालयाने मोदी विरोधात अटक वारंट जारी केला होता. अटक झाल्यानंतर मोदीने न्यायालयात जामीन अर्जही दाखल केला होता. मात्र तो फेटाळून लावत न्यायालयाने २९ मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

ममता बॅनर्जी पत्रकारांशी बोलताना

देशामध्ये मात्र नीरव मोदीच्या अटकेचे श्रेय केंद्रातील मोदी सरकारने घेऊ नये, असे वारे सुरू आहेत. नीरव मोदीला शोधण्यात भारतातील तपास यंत्रणा अपयशी ठरली, असे काही राजकारण्यांचे मत आहे. निरव मोदी लंडनमध्ये आहे हे लंडन येथील एका वृत्त पत्राच्या पत्रकाराने शोधून काढले. त्यानंतरच नीरव मोदी लंडन येथे असल्याचे समजले. त्यामुळे मोदी सरकारला याचे श्रेय घेण्याची गरज नाही, असे म्हटले आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तीला देशातील सरकार पळून जाऊ कशी देते, असे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचे म्हणणे आहे. तर, निवडणुका आल्यात म्हणून नीरव मोदीला लंडन येथून अटक करण्यात आली, असे काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांचे म्हणणे आहे. तर, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अबद्दुल्ला यांनीही सरकारवर टीका केली आहे. नीरव मोदीला देशाच्या बाहेर पळवण्यात याच सरकारचा हात होता आणि आणण्यातही याच सरकारचा हात आहे. निवडणुका पार पडल्यानंतर चुकीने ही सरकार पुन्हा सत्तेत आली तर, त्याला परत सोडण्यात येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

Intro:Body:

निरव मोदीच्या अटकेचे श्रेय घेण्याची सरकारची लायकी नाही - ममता बॅनर्जी

कोलकाता - पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) कर्ज बुडवणाऱ्या निरव मोदीला लंडनमध्ये अटक झाली आहे. त्याच्या अटकेनंतर मात्र देशात राजकीय वातावरण तापू लागले आहे. मोदीला पकडण्याचे श्रेय घेण्याची केंद्रातील भाजप सरकारची लायकी नसल्याची टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. तर, भाजपविरोधी अनेक नेत्यांनीही हाच सूर लावला आहे.

पीएनबीला १३ हजार ५०० कोटी रुपयांचा चुना लाऊन पसार झालेल्या निरव मोदीला बुधवारी लंडनच्या होलबोर्न येथे अटक करण्यात आली. अटकेच्या दोन दिवस आधिच सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने लंडन सरकारला त्याचे प्रत्यर्पण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर लंडनच्या वेस्टमिंस्टर न्यायालयाने मोदी विरोधात अटक वारंट जारी केला होता. अटक झाल्यानंतर मोदीने न्यायालयात जामीन अर्जही दाखल केला होता. मात्र, तो फेटाळून लावत न्यायालयाने २९ मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. 

देशात मात्र निरव मोदीच्या अटकेचे श्रेय केंद्रातील मोदी सरकारने घेऊ नये, असे वारे सुरू आहेत. निरव मोदीला शोधण्यात भारतातील तपास यंत्रणा अपयशी ठरली, असे काही राजकारण्यांचे मत आहे. निरव मोदी लंडनमध्ये आहे, हे लंडन येथील एका वृत्त पत्राच्या पत्रकाराने शोधून काढले. त्यानंतरच निरव मोदी लंडन येथे असल्याचे समजले. त्यामुळे मोदी सरकारला याचे श्रेय घेण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. 

हजारो कोटींचे कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तीला देशातील सरकार पळून जाऊ कशी देते, असे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचे म्हणणे आहे. तर, निवडणुका आल्या म्हणून निरव मोदीला लंडन येथून अटक करण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी केला आहे. तर, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अबद्दुल्ला यांनीही सरकारवर टीका केली आहे. निरव मोदीला देशाच्या बाहेर पळवण्यात याच सरकारचा हात होता आणि आणण्यातही याच सरकारचा हात आहे. निवडणुका पार पडल्यानंतर चुकीने ही सरकार पुन्हा सत्तेत आली तर, त्याला परत सोडण्यात येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

Conclusion:
Last Updated : Mar 21, 2019, 10:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.